शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार; कोयना धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीकडे..

By नितीन काळेल | Published: July 19, 2024 6:08 PM

धरणात ३९ हजार क्यूसेकने आवक : नवजाला १६६, महाबळेश्वरला १३१ मिलीमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरूवारपासून संततधार असून २४ तासांत नवजाला सर्वाधिक १६६ तर महाबळेश्वरला १३१ मिलीमीटरची नोंद झाली. त्याचबरोबर धरणक्षेत्रातही पाऊस वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणात आवक वाढून सुमारे ३९ हजार क्यूसेकवर पोहोचली. तर धरणातील पाणीसाठा ४७ टीएमसीवर गेला आहे.पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वरसह कोयना परिसरात चार दिवस पावसाची उघडझाप सुरू होती. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक कमी झालेली. मात्र, गुरूवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पश्चिमेकडेच सर्वत्रच एकसारखा पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे ओढे, नाले पुन्हा खळाळून वाहू लागले आहेत. त्याचबरोबर धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी धरणक्षेत्राही पाऊस वाढत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. तर कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर एकदम वाढला. सर्वत्रच पाऊस होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. परिणामी पाणीसाठा वाढत चालला आहे.

शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १६६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर यावर्षी आतापर्यंत २ हजार ६२० मिलीमीटर पाऊस पडला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे. तर कोयनेला २४ तासांत ११४ आणि आतापर्यंत २ हजार २०१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. महाबळेश्वरच्या पावसानेही दोन हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला. शुक्रवारी सकाळपर्यंत २ हजार ६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली. तर कोयना धरणात ३८ हजार ७७६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ४७.४१ टीएमसीवर पोहोचला होता. धरण भरण्यासाठी अजून सुमारे ५७ टीएमसी पाण्याची गरज आहे.

साताऱ्यात सकाळपासूनच रिमझिम..सातारा शहरातही पाऊस वाढत चालला आहे. गुरूवारी रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. रात्रभरही पाऊस पडत होता. तसेच शुक्रवारी सकाळीही पाऊस सुरूच होता. यामुळे नागरिकांनाही रेनकोट घालून आणि छत्री घेतल्याशिवाय घराबाहेर पडता येत नव्हते. तर पूर्व भागात अनेक ठिकाणी पावसाच्या झडी येऊन जात आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान