लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक परिसरात सोमवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे एक दीड तास पडलेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
पिंपोडे बुद्रुक व परिसरात गेल्या आठवड्यापासून अधूनमधून ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन असे वातावरण निर्माण होत होते. परंतु खरिपाच्या हंगामात नुकतेच पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज होती. पावसाने पाठ फिरवल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली होती. तथापि दुपारच्या वेळी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे खरिपाच्या पिकांच्या वाढीला चालना मिळणार आहे. परिसरातील पावसाअभावी रखडलेली पेरणीची व इतर कामे मार्गी लागतील.
फोटो २८पिंपोडे बुद्रुक
पिंपोडे बुद्रुक परिसरात सोमवारी झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतात पाणी साचून राहिले होते. (छाया : संतोष धुमाळ)