शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 3:17 PM

कराड तालुक्यातील उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे. 

ठळक मुद्देकराड तालुक्यातील उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे. सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर परिस्थितीचा फटका हा जिल्ह्यातील 598 कुटुंबे तर 2 हजार 568 नागरिकांना बसला.

सातारा - कराड तालुक्यातील उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे. 

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी मंगळवारी (6 ऑगस्ट) उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी या पुरग्रस्तांना अन्न व पाण्याची  सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी   कराडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी नागठाणे जवळील उरमोडी नदीवरील पुलाची व उंब्रज येथील तारळी नदीवरील पुलांचीही पाहणी केली.

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी अहोरात्र मिशन मोडवर काम करीत आहे. उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा फटका हा जिल्ह्यातील 598 कुटुंबे तर 2 हजार 568 नागरिकांना बसला आहे. या नागरिकांची जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा, अंगणवाड्या, समाजमंदिरामध्ये, मंदिरांमध्ये, तात्पुरते शेड उभे करुन  त्यांची तात्पुत्या निवाऱ्याबरोबर त्यांच्या अन्न पाण्याचीही सोय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कराड शहराला पुराने वेढले; NDRF टीम दाखल 

दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. कृष्णा, कोयना या नद्यांना पूर आल्याने कराड, पाटण परिसरात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून एनडीआरएफची टीम मागविण्यात आली आहे. पाटण व कराड तालुक्यातील पुरस्थितीत लोकांच्या सुरक्षेच्या कारणासाठी आज पुण्यावरुन एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल होणार आहे. या टीमला प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन पुरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.

एनडीआरएफ टीमकडे 2 बोटी व प्रशासनाकडे 2 बोटी असे एकूण 4 बोटी असून या बोटी कराड व पाटण तालुक्यातील लोकांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहेत. या एनडीआरएफच्या टीममध्ये 22 ते 24 जवान असणार असून या टीमला प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या  सूचनांनुसार ही टीम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी काम करणार आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. कराडलाही तुफान पाऊस सुरू आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणने नवीन कृष्णा पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या सुचना पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे कराड- विटा रोडवरील नवीन कृष्णा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन कराड तालुका प्रशासनाने केले आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसfloodपूर