प्रमोद सुकरेकराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात प्रतिसेकंद 14 हजार 152 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या धरणात 16 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. पुर्वेकडील सिंचनासाठी पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल 129 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगर येथे 74 मिलीमीटर तर नवजा येथे 118 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पावसाला सुरूवात झाल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाण्याची पातळी 2045 फूट झाली आहे. पुर्वेकडील सिंचनासाठी पायथा वीजगृहात 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली आहे.संपुर्ण जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने कोयना धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला होता. पश्चिमेकडील वीजनिर्मिती ठप्प होण्याच्या मार्गावर होती. अशातच आता पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासात धरणात प्रतिसेकंद 14 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे.दोन दिवसांत पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढकोयना धरणातील पाणीसाठा 13 टीएमसीवर आला होता. मात्र, दोन दिवसांत पावसाचे आगमन झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ झाली असून धरणातील पाणीसाठा 16 टीएमसी झाला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 10:38 AM