शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

Satara: कोयना धरणात तब्बल सहा टीएमसी पाण्याची आवक, पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 1:46 PM

नीलेश साळुंखे कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात काही दिवस दमदार हजेरीवगळता पावसाची रिमझिम सुरू असल्याने धरणामध्ये ...

नीलेश साळुंखेकोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात काही दिवस दमदार हजेरीवगळता पावसाची रिमझिम सुरू असल्याने धरणामध्ये सहा टीएमसी पाण्याची आवक झाली आहे तर धरणाच्या पाणीसाठ्यात सुमारे दीड टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सध्या १९.०१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.कृष्णा पाणी वाटप लवादानुसार नवीन तांत्रिक वर्ष १ जूनपासून सुरू झाले आहे. त्यास एक महिना पूर्ण होत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. विजेचा लखलखाट, कधी ढगांच्या गडगडाटासह अचानक धो-धो पाऊस पडला तर अचानक स्वच्छ प्रकाशासह रखरखत ऊन पडत होते. या ऊन व पावसाचा खेळात महिना संपला. या पावसाने कोयना नदी तुडुंब भरून वाहू लागली की पूर्वेकडे पायथा वीजगृहातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग ८ जूनला बंद करण्यात आला, तो आजवर कायम आहे.मात्र, जून महिन्यात कोयना भागात पावसाच्या हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरीने बळिराजा सुखावला आहे. भात नाचणीचे तरवे हिरवेगार तजेलदार आहे. काही ठिकाणी लावणीस सुरूवात झाली आहे. एकंदरीत पावसाने शेतीच्या कामांना गती आहे. यापुढे जुलै महिन्यात धरण भरण्यासाठी व भात लावणीसाठी मुसळधार पावसाची गरज आहे.कोयना धरणात ३० जूनला सकाळी आठ वाजता १९.०१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्यात ५.६५ टीएमसी पाण्याची आवक झाली असून यामधील पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी ३.४४ टीएमसी पाण्याचा वापर करत १५० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. पूर्वेला सिंचनासाठी पायथा वीजगृहातीतून १.०३ टीएमसीचा वापर करत ३ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. बाष्पीभवन व गळतीसह ४.७२ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यातही सुमारे दीड टीएमसीने वाढ झाली आहे.

पाणलोट रविवारी सायंकाळीपर्यंत झालेला एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये

  • कोयना : ८०१
  • नवजा १०२३
  • महाबळेश्वर ८००
  • वळवण ११०८

पाथरपुंज येथे पुन्हा धो-धोसातारा, सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील सह्याद्री पर्वतरांगांतील पाटण तालुक्यातील पाथरपुंज याठिकाणी ११७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बहुधा जिल्हातील सर्वाधिक आहे. २०१९ मध्ये पाथरपुंज याठिकाणी दहा हजार मिलिमीटर पाऊस झाल्याची नाेंद होती. देशात सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या चेरापुंजीला पाथरपुंजने मागे टाकले होते.

मागील ३ वर्षांतील जून महिन्यातील धरणाचा पाणीसाठावर्ष - पाणीसाठा - महिन्यात वाढ

  • २०२१ : ४२.४२ टीएमसी - १३.१५ टीएमसी वाढ
  • २०२२ : २१.१८ टीएमसी - ७.६३ टीएमसी वाढ
  • २०२३ : १२.२१ टीएमसी - ५.४३ टीएमसी घट
  • २०२४ १९.०१ टीएमसी - १.४३ टीएमसीने वाढ
टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण