सातारा : सातारा शहरात रविवारी दुपारच्या सुमारास रिमझिम स्वरूपात पाऊस पडला. यामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. दुपारनंतर मात्र, ढगाळ वातावरण तयार झाले होते.
सातारा शहर व परिसरात जवळपास १५ दिवस पाऊस सुरू होता. मात्र, मागील पाच-सहा दिवसांपासून पावसाची उघडीप होती. ढगाळ वातावरण तयार होत असलेतरी पाऊस पडत नव्हता. मात्र, रविवारी दुपारी साडेबारानंतर शहरात रिमझिम स्वरूपात पाऊस पडण्यास सुरुवात झाली. जवळपास १५ ते २० मिनिटे पाऊस पडत होता. यामुळे विक्रेत्यांची धावपळ उडाली. भाजी मंडईत आलेल्या शेतकऱ्यांना माल सुरक्षित ठिकाणी हलवावा लागला. तसेच बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली. पाऊस उघडल्यानंतर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले. दरम्यान, पावसाच्या उघडीपीनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. मात्र, हवेतील गारठा वाढला होता.
..........................................