शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

संकटात सापडलेल्या ठेवीदारांना मिळू शकते मदत

By admin | Published: December 17, 2015 10:36 PM

१0 जानेवारीपर्यंत निर्बंध कायम : संचालक मंडळाचे अधिकार अजूनही अबाधित!

सातारा : ‘जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे येथील जिजामाता महिला सहकारी बँकेवर शिफारस करण्यात आली असली तरीही या बँकेवर अद्याप संचालक मंडळाचे अधिकार कायम आहेत. जोपर्यंत प्रशासक नेमण्याची अथवा बँक अवसायनात आणण्यासंदर्भातील निर्णय होत नाहीत, तोपर्यंत संकटात सापडलेल्या व अतिनिकड असणाऱ्या ठेवीदारांना बँकेच्या संचालक मंडळाला रिझर्व्ह बँकेकडे शिफारस करून ठेवी परत मिळविता येऊ शकतील,’ अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रिझर्व्ह बँकेने येथील जिजामाता महिला सहकारी बँकेवर १0 जुलै २0१५ रोजी निर्बंध घातले होते. या निर्बंधामुळे बँकेला एक हजार रुपयांच्या वरील व्यवहार करता येत नव्हते. बँकेच्या संचालक मंडळावर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने हे व्यवहारही आता पूर्णपणे ठप्प झाले आहेत. आता अतिनिकडीच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळणे आवश्यक असल्याने संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार तसा प्रस्ताव तयार करून तो रिझर्व्ह बँकेकडे पाठविता येऊ शकतो. संचालक मंडळाचे अधिकार बँकेवर अजूनही कायम असल्याने संचालक मंडळाने तातडीने असे निर्णय घ्यावेत, अशी ठेवीदारांची मागणी आहे. कुणाच्या घरात लग्न ठरले आहे, कुणाला आॅपरेशन करायचे आहे, मुलांची शैक्षणिक फी भरायची आहे, अशा तातडीच्या बाबींसाठी ठेवी परत मिळणे आवश्यक आहे. याला ‘हार्डशिप केसेस’ असे म्हटले जाते. मात्र, यासाठी पुरावा सादर करणे आवश्यक आहे. ठेवीदारांच्या दबावानंतर बँकेने २७ ठेवीदारांचे प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केले होते. हे प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती पुढे येत आहे. बँकेत वृध्द नागरिक, महिला, कष्टकरी लोकांचे पैसे ठेव स्वरूपात अडकून पडले आहेत. या ठेवींच्या व्याजावर काहींचे घर चालत होते. तेही आता अडचणीत आले आहेत. बँकेवर प्रशासक नेमण्याआधी संचालक मंडळाने तातडीने गरज असणाऱ्या ठेवींची पूर्तता करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे आवश्यक असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) संयुक्त कृती दलाच्या बैठकीकडे लक्षजिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिजामाता बँकेवर प्रशासक नेमण्याची शिफारस सहकार आयुक्तांकडे केली आहे. सहकार विभाग व रिझर्व्ह बँकेचे संयुक्त कृती दल बैठक घेऊन याबाबत निर्णय घेणार आहेत. या बैठकीकडे ठेवीदारांच्या नजरा लागल्या आहेत.