कराड
येथील गांधी फाउंडेशन कोरोनाच्या महामारी संकट काळात गरजूंच्या मदतीला धावून आले आहे. त्यांनी अनेक गरजूंना किराणा साहित्याचे मोफत वितरण केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.
कोरोना महामारी संकटामुळे आज राज्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे तर छोटे व्यवसाय बंद राहिल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे .अशा वेळी या गरजूंच्या मदतीला गांधी फाउंडेशन सरसावले आहे.
लाॅकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या लोकांना किमान दोन वेळचे अन्न मिळावे या हेतूने धीरज गांधी यांनी आपल्या फाउंडेशनच्या वतीने किराणा साहित्य वाटप केले आहे. कराड व परिसरातील गरजूंना हे वाटप करण्यात आले आहे.
फोटो
कराड येथे गांधी फाऊंडेशनच्या वतीने गरजूंना किराणा साहित्य वाटप करण्यात आले.