लोणंद येथील शेतकऱ्यांची पाण्यासाठी उच्च न्यायालयात धावलोणंद : स्थानिक शेतकऱ्यांकडून संपादित करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलेल्या रकमेपैकी ६५ टक्के रक्कम परत घेऊन त्यांचे सातारा जिल्ह्यातील शेडगेवाडी, ता. खंडाळा येथे पुनर्वसन केले. मात्र, या ठिकाणी शेतीसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रकल्पग्रस्तांना शेतीशिवाय आपले घर चालवण्याची वेळ आली. नीरा-देवघर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी शेडगेवाडीपर्यंत पोहोचण्याची सोय असतानाही राज्य सरकारने ती उपलब्ध करून दिली नाही. सरकारकडे वारंवार निवेदन करून आश्वासनाशिवाय काहीही ठोस पावले उचलण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.उदरनिर्वाह करण्याच्या अधिकारावर राज्य सरकारने गदा आणली आहे. त्यामुळे संबंधितांना दरमहा १५ हजार रुपये उदरनिर्वाह चालवण्यासाठी देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये नीरा-देवघर प्रकल्पग्रस्त खंडाळा तालुक्यात दापकेघर, देवघर आणि साळव आणि फलटण तालुक्यात माझेरी, परहर बुद्रुक, खुर्द, शिरवली, वाखंड अशी एकूण सहा गावे असून, या निकालाचा फायदा या गावानांसुद्धा होणार आहे. (वार्ताहर)
लोणंद येथील शेतकऱ्यांची पाण्यासाठी उच्च न्यायालयात धाव
By admin | Published: March 11, 2017 4:48 PM