Satara: न्यायाधीश निकम यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:40 IST2025-03-18T15:40:14+5:302025-03-18T15:40:35+5:30
सातारा : लाच मागणी प्रकरणात सातारा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. सातारा जिल्हा ...

Satara: न्यायाधीश निकम यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
सातारा : लाच मागणी प्रकरणात सातारा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला.
सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांच्याकडे सुरू असलेल्या एका प्रकरणात संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी मध्यस्थींमार्फत ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर डिसेंबर २०२४ मध्ये लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार एका युवतीने दिली आहे.
या घटनेनंतर न्यायाधीश निकम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे न्यायाधीश निकम यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. परंतु, उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे लाचलुचपत विभागाचे पथक करत आहे.