शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

एप्रिल महिन्यात उच्चांकी रुग्णवाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:40 AM

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यासाठी एप्रिल महिना धोक्याचा ठरला. तालुक्यामध्ये महिनाभरात तब्बल पाच हजारांवर रुग्ण वाढले असून आजअखेरची ही उच्चांकी ...

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यासाठी एप्रिल महिना धोक्याचा ठरला. तालुक्यामध्ये महिनाभरात तब्बल पाच हजारांवर रुग्ण वाढले असून आजअखेरची ही उच्चांकी रुग्णवाढ आहे. या महिन्यात काही रुग्णांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. संक्रमणाचा वेग अद्याप कायम असल्याने सध्या आरोग्य विभागावर प्रचंड ताण आहे.

गतवर्षी एप्रिल महिन्यातच कोरोनाचा कऱ्हाड तालुक्यात शिरकाव झाला होता. सुरुवातीच्या महिन्यातच तालुक्यात ३३ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर संक्रमणाचा वेग वाढला. आणि केवळ ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या तीन हजारांवर जाऊन पोहोचली. त्यानंतरचा सप्टेंबर महिना सर्वाधिक संक्रमणाचा ठरला. चार हजारांवर रुग्ण गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात वाढले होते. ऑक्टोबर २०२० पासून जानेवारी २०२१ पर्यंत रुग्णसंख्या घटत गेली. कोरोना संक्रमण कमी झाल्यामुळे जनजीवनही पूर्वपदावर येत होते. मात्र, फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. ती आजअखेर कायम आहे. गत चार महिन्यांत तालुक्यामध्ये टप्प्याटप्प्याने रुग्णवाढ सुरू आहे. त्यातच एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले आहेत.

सद्य:स्थितीत तालुक्यात अडीच हजारांवर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणखी काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करताना नातेवाइकांना कसरत करावी लागत आहे.

- चौकट

कऱ्हाडात ३७३, मलकापुरात १९३ रुग्ण

कऱ्हाडसह मलकापूर शहरात सध्या कोरोना रुग्णांची साखळी निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. बाधिताच्या कुटुंबांतील तसेच संपर्कातील अनेकजण पॉझिटिव्ह आढळत असून ही साखळी खंडित करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. आजअखेर कऱ्हाडातील रुग्णसंख्या ३ हजार ५८२ तर मलकापुरातील १ हजार ८१३ असून सद्य:स्थितीत कऱ्हाडात ३७३ तर मलकापुरात १९३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- चौकट

कोरोनामुक्त : ८१.७९ %

उपचारात : १५.६८ %

दुर्दैवी मृत्यू : २.५३%

- चौकट

२०२०-२०२१ रुग्णवाढ

महिना : रुग्ण

मार्च : ०

एप्रिल : ३३

मे : १४८

जून : १५९

जुलै : ५१९

ऑगस्ट : २९९७

सप्टेंबर : ४३९५

ऑक्टोबर : १००२ नोव्हेंबर : २९८

डिसेंबर : १७१

जानेवारी : ८९

फेब्रुवारी : १३८

मार्च : ५९२

एप्रिल : ५२७२

- चौकट

अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : २४८०

होम आयसोलेशनमध्ये : १७९९

रुग्णालयात दाखल : ६८१

- चौकट

उपचारात रुग्ण

कृष्णा हॉस्पिटल : ३४७

सह्याद्री हॉस्पिटल : ५३

उपजिल्हा रुग्णालय : ४३

जिल्हा रुग्णालय : ३

पार्ले, सह्याद्री सेंटर : १३४

एरम हॉस्पिटल : ३४

श्री हॉस्पिटल : ३६

कऱ्हाड हॉस्पिटल : ३१

(आरोग्य विभागाच्या ४ मे च्या अहवालानुसार)

- चौकट

कोरोना अपडेट

एकूण बाधित : १५८१३

कोरोनामुक्त : १२९३५

दुर्दैवी मृत्यू : ३९८

उपचारात : २४८०