शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

LokSabha2024: माढ्याच्या शिलेदाराचा माण, फलटणमधील मतदार करणार फैसला! 

By नितीन काळेल | Published: May 06, 2024 6:33 PM

नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली 

सातारा : नेत्यांच्या सभा आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान होत असून सुमारे २० लाख मतदार आपला हक्क बजावणाार आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदान हे माण विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४८ हजार इतके आहे. तर माढ्यासाठी सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघातील ६ लाख ८२ हजार मतदार आहेत.माढा लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभेचे मतदारसंघ येतात. मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिली निवडणूक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिकंली होती. तर दुसऱ्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवलेला. तर २०१९ च्या तिसऱ्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विजय मिळवला. त्यामुळे या मतदारसंघात प्रथमच कमळ फुलले. आताची ही चाैथी निवडणूक होत आहे.माढा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होत आहे. मतदारसंघात १५ मार्चपर्यंत नोंदणी असलेले १९ लाख ८० हजार ८५९ मतदार आहेत. तरीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दहा दिवसांपर्यंत मतदार नोंदणी करता येत होती. त्यामुळे आणखी काही मतदारांचा आकडा वाढलेला आहे.या निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदार हे माण विधानसभा मतदारसंघातील आहेत. माणध्ये ३ लाख ४८ हजार २०५ मतदारांची नोंद झालेली आहे. त्यानंतर माळशिरसमध्ये ३ लाख ३५ हजार ८२३ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. तर माढा विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३५ हजार ४५०, फलटण ३ लाख ३४ हजार ८५५, करमाळा ३ लाख १६ हजार ७४५ आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात ३ लाख १० हजार ५१ मतदार हे १५ मार्चपर्यंत नोंद झालेले आहेत.

८५ वर्षांवरील ३१ हजार मतदार..दि. १५ मार्चपर्यंत नोंद झाल्यानुसार माढा लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ३१ हजार ७१२ मतदार आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात ५ हजार २१२, सांगोला ४ हजार ३३४, माळशिरस विधानसभा मतदारसंघ ५ हजार ८, फलटणमध्ये ५ हजार ९४६ आणि माण विधानसभा मतदारसंघात ५ हजार ८२७ मतदार तसेच माढ्यातही पाच हजारांवर मतदार हे ८५ वर्षांवरील आहेत. तर आताच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील हाचाल न करता येणाऱ्या मतदारांसाठी घरीच मतदानाची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे अनेकांचे मतदान झालेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४madha-pcमाढा