कृष्णा रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. विजयसिंह पाटील, मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी व हायवे पोलीस मित्र, शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
महामार्ग पोलीस विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक राजन सस्ते व महामार्ग पोलीस विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महामार्गावर हायवे मृत्युंजय दूत अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने या अभियानाची सुरुवात येथील आनंदराव चव्हाण विद्यालयात करण्यात आली.
या कार्यक्रमात हायवे मृत्युंजय दूत यांना उपयोगी येणारे महामार्ग पोलीस केंद्राच्या हद्दीतील मोठ्या रुग्णालयांची नावे, ठिकाण व संपर्क नंबर, महामार्गावर अपघात झाल्यानंतर तत्काळ उपलब्ध होतील, अशा रुग्णवाहिकेचे ठिकाण आणि संपर्क नंबर अशी सर्व माहिती देण्यात आली. तसेच माहितीपत्रकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचे मृत्युंजय दूतांना वाटप करण्यात आले.
डॉ. विजयसिंह पाटील यांनी अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करताना काय करावे, काय करू नये, जखमी व्यक्तीचा जीव कसा वाचवावा, याबाबत प्रात्यक्षिकातून सविस्तर माहिती दिली.
- चौकट
मृत्युंजय दूतांना अधिकृत ओळखपत्र
महामार्ग पोलीस केंद्राकडून राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मॉल, पेट्रोल पंप, ढाबा, हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच महामार्गालगतच्या गावातील चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार करण्यात येणार आहे. त्यांना हायवे मृत्युंजय दूत असे संबोधण्यात येणार असून तसे ओळखपत्र त्यांना दिले जाणार आहे. हायवे मृत्युंजय दूत व्यक्तींना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
फोटो : ०३केआरडी०५
कॅप्शन : मलकापूर येथे ‘हायवे मृत्युंजय दूत’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी माहितीपत्रकाचे अनावरण डॉ. विजयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.