शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

कोल्हापूर नाक्यावर महामार्ग ‘हायजॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 10:50 PM

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येथील कोल्हापूर नाका मृत्यूला निमंत्रण देणारा ठरतोय. नाक्यावर खासगी बस तसेच वडापची वाहने कुठेही आणि कशीही पार्क केली जातायत. तसेच प्रवासीही निम्म्या रस्त्यात उभे राहून वाहनांना हात करतायत. त्यामुळे भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कºहाडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावर दररोज ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येथील कोल्हापूर नाका मृत्यूला निमंत्रण देणारा ठरतोय. नाक्यावर खासगी बस तसेच वडापची वाहने कुठेही आणि कशीही पार्क केली जातायत. तसेच प्रवासीही निम्म्या रस्त्यात उभे राहून वाहनांना हात करतायत. त्यामुळे भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कºहाडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावर दररोज किमान एक तरी किरकोळ अपघात घडतो. आत्तापर्यंत येथे झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्येक रविवारी याठिकाणी कोल्हापूर-सातारा लेनवर चार-चार तास वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना अक्षरश: घाम गाळावा लागतो. कोल्हापूरहून साताऱ्याकडे जाणारी वाहने, कºहाडात जाणारी वाहने आणि शहरातून बाहेर पडणारी वाहने एकाचवेळी एकाच ठिकाणी येत असल्यामुळे याठिकाणी अनेकवेळा गोंधळ उडतो. त्यातच एखादे वाहन गर्दीत अडकले तर वाहतूक कोंडीची समस्या आणखीनच गंभीर होते. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना रात्री उशिरापर्यंत धडपड करावी लागते.गर्दीतून मार्ग काढत महामार्गावरून कºहाडमध्ये प्रवेश करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवेश करावा लागतो. येथे कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाण्यासाठी असलेल्या लेनवर उड्डाणपूल नसल्यामुळे शहरात येणारी वाहने व पुढे सातारा तसेच पुणे, मुंबईकडे जाणारी वाहने एकाच लेनवरून धावत असतात. महामार्गावर बºयाचवेळा सातारा, पुणे बाजूकडे जाणारी वाहने भरधाव वेगात असतात. तर शहरात येणाºया वाहनांचा वेग मंदावलेला असतो, अशा परिस्थितीत अनेकवेळा अपघात घडले आहेत. प्रवासी घेण्यासाठी खासगी वाहने महामार्गावरच उभा केलेली असतात. तर प्रवासीही वाहनांची वाट बघत निम्म्या महार्गावर उभे राहिलेले असातात. त्यामुळे वेगात असलेले वाहन उभ्या राहिलेल्या प्रवाशांमधे घुसून काहीवेळा याठिकाणी लहान-मोठे अपघात घडले आहेत. महामार्ग वाहनांनी तर उपमार्ग स्थानिक वडापने हायजॅक केल्यामुळे पादचाºयांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागते.‘खाकी’समोरच राजरोस वडापकोल्हापूर नाक्यावरून विविध मार्गांवर परमिट व बिगर परमिट वडाप करणाºयांची संख्या शेकडोंच्या घरात आहेत. ही वडाप वाहने उपमार्गावर ठाण मांडतात. तर कºहाडहून पुण्या-मुंबईकडे जाणाºया प्रवाशांसाठी दररोज व्हीआयपी वडापची वाहने महामार्गावरच ठाण मांडतात. दिवसभर याठिकाणी वाहतूक नियंत्रण करणाºया पोलीस कर्मचाºयांसमोरच राजरोसपणे प्रवाशांची ने-आण सुरू असते.रात्री खासगी बसचे थैमानदररोज सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत कोल्हापूर नाक्यावर जायची वेळ आल्यास सामान्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. रात्रीच्यावेळी अनेक खासगी प्रवासी बस कोल्हापूर नाक्यावरून पुण्या-मुंबईकडे जातात. त्यातील बहुतांशी बस प्रवासी घेण्यासाठी याठिकाणी थांबतात. अनेक बसचालक उपमार्गासह महामार्गावरच बस उभ्या करून जेवण किंवा चहा, नाष्टा करण्यासाठी जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. काही दिवसांपूर्वी ब्रेक निकामी झालेला ट्रक उभ्या बसवर आदळून मोठा अपघात झाला होता.उड्डाणपुलाचा प्रस्ताव रखडलाकोल्हापूर नाक्यावर होणारे अपघात विचारात घेता याठिकाणी सातारा, पुणे, मुंबईला जाणाºया वाहनांसाठी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी भूगर्भातील थर परीक्षण केले गेले. मात्र, हे परीक्षण तेवढ्यावरच थांबले. त्याचे पुढे काय झाले, हे कोणलाच माहिती नाही. तसेच अनेकवेळा विविध विभागांकडून पाहणी करून पुलाचे नकाशे तयार केले गेले,ते नकाशेही केवळ कागदोपत्रीच राहिले आहेत.