काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी पडझडीच्या काळात १९९९ सालापासून काँग्रेस पक्षाची तालुक्यात धुरा सांभाळली आहे. ढेबेवाडी विभागात सलग २० वर्षे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांच्याकडे सत्ता होती. याकाळात त्यांनी चांगले काम करून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना विभागात अनेक मोठी कामे केली. तालुक्यातील पक्ष संघटनेला ताकद म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने हिंदुराव पाटील यांची नियोजनचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. हिंदुराव पाटील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद शेती सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे.
दरम्यान, मिळालेल्या पदाचा वापर विकास कामांसाठी करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही हिंदुराव पाटील यांनी निवडीनंतर बोलताना दिली.
फोटो : १२हिंदुराव पाटील