आॅनलाईन लोकमतवाठार स्टेशन (जि. सातारा), दि. १८ : तीन वर्षात केंद्र सरकारने अनेक साहसी निर्णय घेत विकासाला गती दिली आहे. कुठेही घोटाळा होऊ दिला नाही. भ्रष्टाचार, काळे धन याबाबत धडक निर्णय घेतले. तसेच राजकीय नफा-तोटा न पाहता नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला, असे मत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.
वाठार स्टेशन येथे आयोजित सबका साथ, सबका विकास संमेलनात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, डॉ. दिलीप येळगावकर, अॅड. भरत पाटील, मनोज घोरपडे, पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते.
चरेगावकर म्हणाले, ह्यपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्षांचा कालावधी उलटला. त्यांनी प्रलंबित पडलेला सैनिकांचा वन रॅँक वन पेन्शन प्रश्न मार्गी लावताना सर्जिकल स्ट्राइकद्वारे आतंकवाद्यांना ठार केले. जन-धन योजनेद्वारे २८ कोटी बँक खाती काढण्यात आली. मोफत गॅस कनेक्शन देऊन दोन कोटींपेक्षा जास्त परिवारांना धूरमुक्त केले. देशाच्या १८ हजार ४५६ गावांत वीज नव्हती. पैकी १३ हजार गावात वीज पोहोचवली. एक लाख २० हजार किलोमीटरचे रस्ते बनवून अनेक गावे प्रमुख मागार्ला जोडली.चरेगावकर पुढे म्हणाले, डीबीटीद्वारे सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होत आहे. मेक इन इंडिया, कॅशलेस व डिजिटल व्यवहार, जीएसटी असे क्रांतीकारी निर्णय घेऊन देशाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी जलसंधारणाकडे लक्ष देण्यात येत आहे. शेतकरी, मागावर्गीय व सर्वसामान्य नागरिकांना केंर्द्रस्थानी ठेवून राबवलल्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे. असे आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ. येळगावकर, पावसकर यांची भाषणे झाली. यावेळी वेस्टर्न कोलफिल्डचे सिद्धार्थ थोरात, सुरेश आफळे, दीपक पिसाळ, बबनराव कांबळे, सोपानराव गवळी, मनोज कलापट, मनोज अनपट, धनंजय तांबे, सुरेश निंबाळकर, डॉ. प्रमोद धुमाळ, गुलनाज पठाण, चित्रा जाधव, राजेंद्र लेंभे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.