सातारा : बादलीमध्ये हिटर सुरू असताना पाणी गरम झाले आहे का, हे पाहण्यासाठी बादलीमध्ये हात घातल्याने सत्तर वर्षीय वृद्धेला शॉक लागला. यामध्ये संबंधित वृद्धा ६० टक्के भाजून गंभीर जखमी झाली असून, ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शाहूपुरी येथे घडली.कमल बापूराव वाघमोडे (वय ७०, रा. शाहूपुरी, सातारा) असे जखमी वृद्धेचे नाव आहे. याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कमल वाघमोडे यांनी बाथरुममध्ये अंघोळीसाठी एका बादलीमध्ये पाणी ठेवले होते. हे पाणी गरम करण्यासाठी त्यांनी बादलीत हिटर सोडला होता. मात्र, चूकून त्यांनी पाणी गरम झाले आहे का, हे पाहण्यासाठी बादलीमध्ये हात घातला.याचवेळी त्यांना जोरदार शॉक लागून त्या बाजूला फेकल्या गेल्या. अंगावरील साडीनेही पेट घेतला. यामध्ये त्या ६० टक्के भाजून जखमी झाल्या. हा प्रकार त्यांच्या घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर घरातल्यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
हिटर सुरू असताना बादलीमध्ये घातला हात; साताऱ्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 2:38 PM
बादलीमध्ये हिटर सुरू असताना पाणी गरम झाले आहे का, हे पाहण्यासाठी बादलीमध्ये हात घातल्याने सत्तर वर्षीय वृद्धेला शॉक लागला. यामध्ये संबंधित वृद्धा ६० टक्के भाजून गंभीर जखमी झाली असून, ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शाहूपुरी येथे घडली.
ठळक मुद्देहिटर सुरू असताना बादलीमध्ये घातला हातशॉक लागून वृद्ध महिला गंभीर जखमी; साताऱ्यातील घटना