सातारा : आधुनिक गॅझेट आणि मोबाईलच्या व्हर्च्युअल विश्वात रमणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नगर वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी खास मोफत बाल विभाग सुरू केला आहे. सलग २५ दिवस येथे येऊन एक तास पुस्तक वाचणाºया विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात येणार आहे.येथील प्रतापसिंह नगर वाचनालयाच्यावतीने विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. १५ एप्रिल ते ३१ मे या दरम्यान हा उपक्रम सकाळी ८.३० ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत सुरू असणार आहे.यांतर्गत वाचनालयातच एक स्वतंत्र जागा या बालकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. या जागेत विद्यार्थी त्यांच्या आवडीचे पुस्तक घेऊन वाचन करू शकतात. पुस्तक वाचन झाल्यानंतर त्याविषयीचे मत विद्यार्थ्यांनी एका वहीत लिहिणं अपेक्षितआहे. येथे येणाºया प्रत्येक विद्यार्थ्याची हजेरीही वाचनालयाच्या वतीने नोंदविण्यात येत आहे.या हजेरी पत्रकानुसार २५ दिवस हजेरी लावणाºया विद्यार्थ्याला एका कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. नगर वाचनालयाच्या वतीने पूर्वी शाहूपुरी, नागठाणे, विलासपूर, शेंद्रे, सदरबझार, अजिंक्य कॉलनी आदी ठिकाणी बालक वाचनालयाची उपकेंद्रे सुरू करण्यात आलीहोती. मात्र, या उपक्रेंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे ती बंद करण्यात आली.वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वाचनालयाच्या या प्रयत्नांना पालकांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुटीतील ‘एक तास वाचनासाठी’ दिला गेला तर समृद्ध आणि वाचणारी पिढी घडेल, यात शंका नाही.या पुस्तकांना आहे मागणीनगर वाचनालयाच्या वतीने उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बाल वाचनालयाचा विभाग करण्यात येतो. यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आवडतील अशी पुस्तके ठेवली जातात. या पुस्तकांमध्ये चिंटू, ययाती, एक होता कार्व्हर, अब्दुल कलाम, सुधा मूर्ती, नापास मुलांची गोष्ट, बर्म्युडा ट्रँगल या पुस्तकांना मागणी आहे. मागणीनुसार त्यांना अन्य पुस्तकेही उपलब्ध करून दिली जातात.
सुटीत विद्यार्थी रमणार पुस्तकांच्या विश्वात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:04 PM