शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

पश्चिम महाराष्ट्रात घरफोड्या करणारा अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:15 AM

सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या मयूर जयवंत बनकर (वय २०, रा. लोणंद, ता. खंडाळा) या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. फलटण ग्रामीण, वडगाव निंबाळकर, भिंगवणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस भागात चोऱ्या केल्याची त्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे कबुली दिली आहे. त्याचे इतर साथीदार अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रात घरफोड्या करणारा अटकेतसातारा, पुणे व सोलापूर जिल्'ातील गुन्हे उघड

सातारा : सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या मयूर जयवंत बनकर (वय २०, रा. लोणंद, ता. खंडाळा) या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. फलटण ग्रामीण, वडगाव निंबाळकर, भिंगवणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस भागात चोऱ्या केल्याची त्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे कबुली दिली आहे. त्याचे इतर साथीदार अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित मयूर बनकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत आहे. त्याच्यावर फलटण ग्रामीण, वडगाव निंबाळकर, भिंगवणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने व त्याच्या टोळीने घरफोडी, चोऱ्या, जबरी चोरी, दुचाकी चोरीचे गुन्हे केले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

दि. २० रोजी कोळकी (ता. फलटण) गावात मयूर बनकर येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना कारवाईच्या सूचना दिल्या. जºहाड यांनी कोळकी परिसरात सापळा लावला असता संशयित सापडला. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली.जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदार तानाजी माने, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर