नवीन शैक्षणिक वर्षात पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या घरातच तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पार पडले. या वेळी ते बोलत होते.
वडगाव शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक संजय खरात यांनी कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी गत शैक्षणिक वर्षापासून वडगाव (ता. माण) येथे त्यांच्या संकल्पनेतून घरोघरी शाळा हा उपक्रम राबवून प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू ठेवले आहे. नवीन शैक्षणिक वर्षातही कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्याने पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्वतंत्र शाळांपैकी अर्पिता ठोंबरे या विद्यार्थिनीसाठी तिच्या घरात तयार केलेल्या शाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते व वर्धाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमास माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, विस्ताराधिकारी सोनाली विभुते, केंद्रप्रमुख नारायण आवळे, सरपंच अजिनाथ जाधव, उपसरपंच संजय ओंबासे आदी उपस्थित होते.
२७दहिवडी
फोटो वडगाव (ता. माण) येथील ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन पाहणी केली.