शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

होमगार्ड सोडणार आता पोलिसांची साथ; शासनाकडून पाच कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:49 AM

हा नियमानुसार करार रद्द झाला असला तरी दुसरा करार मात्र पोलिसांच्या ताणतणावात भर घालणारा आहे. जिल्ह्यात वाहतूक नियमन करण्यासाठी जिल्हा समादेशक कार्यालयाकडून होमगार्डस्ना पोलिसांच्या सोबत बंदोबस्तासाठी पाठविले जात होते.

ठळक मुद्देवाहतूक नियमन करताना होणार आता पोलिसांची कसरत

दत्ता यादव ।सातारा : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून उन्हा-तान्हात उभ्या असणाऱ्या होमगार्डस्ना नाईलाजाने पोलिसांची साथ सोडावी लागलीय. गेल्या तीन महिन्यांपासून शासनाकडून थकीत अनुदान न मिळाल्याने होमगार्डस्च्या राज्य पातळीवरून हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पोलिसांना आता वाहतूक नियमन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होताना दोन वर्षांसाठी होमगार्डस्ची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी ग्रेड सेपरेटरच्या बंदोबस्ताची मुदत संपल्याने होमगार्डस्नी बंदोबस्त बंद केला आहे. हा नियमानुसार करार रद्द झाला असला तरी दुसरा करार मात्र पोलिसांच्या ताणतणावात भर घालणारा आहे. जिल्ह्यात वाहतूक नियमन करण्यासाठी जिल्हा समादेशक कार्यालयाकडून होमगार्डस्ना पोलिसांच्या सोबत बंदोबस्तासाठी पाठविले जात होते. त्यामुळे पोलिसांना मोठा हातभार लागत होता. एवढेच नव्हे तर पोलिसांना तपासासाठी वेळदेखील मिळत होता.

उन्हा-तान्हात धुळीमध्ये पोलिसांसोबत उभ्या राहणाºया होमगार्डस्ना मात्र गेल्या काही महिन्यांपासून पगार दिला जात नव्हता. शासनाकडून अनुदान मिळाले नसल्यामुळे सर्व होमगार्डस् बिनापगारी काम करत होते. जिल्ह्यात ६४० होमगार्डस्ची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती. एका दिवसाला एका होमगार्डला ६७० रुपये दिले जातात. असे महिन्याकाठी प्रत्येक होमगार्डला २० हजार १०० रुपये मानधन मिळत होते.गेल्या तीन-चार महिन्यांपासून होमगार्डस्चे मानधन मिळाले नसल्यामुळे शासनाकडे तब्बल पाच कोटींहून अधिक थकबाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांसोबत वाहतूक नियमनामध्ये तैनात असलेल्या होमगार्डस्ना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश राज्याच्या होमगार्ड महासमादेशकांनी दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार होमगार्डना वाहतूक नियमनातून बाजूला करण्यात आले आहे.

पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे होमगार्डची पोलिसांना चांगली साथ मिळत होती. ज्या ठिकाणी सहा ते सात पोलीस आवश्यक होते. त्या ठिकाणी केवळ तीन होमगार्डस्मध्ये काम सुरळीत पार पडले जात होते. मात्र, आता या पुढे पोलिसांना मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. होमगार्ड असताना पोलिसांना थोडा दिलासा तरी मिळत होता. परंतु आता ही परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. पोलिसांच्या सोबतीला आता होमगार्ड नसल्यामुळे पोलिसांवरील ताण साहजिकच वाढण्याची शक्यता आहे.

 

  • जे अधिकार पोलिसांना तेच होमगार्डना

वाहतूक नियमन करताना अनेकदा होमगार्डस्ना वाहनचालकाकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. होमगार्डना कोणतेच अधिकार नाहीत, अशी अनेकांची समज आहे. परंतु वास्तविक जे अधिकार पोलिसांना आहेत तेच अधिकार होमगार्डना आहेत. वाहतूक नियमन करताना एखाद्याने अरेरावी केली तर होमगार्डसही शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू शकतो.

  • ..पण इथे होमगार्ड तैनात असतील

सातारा जिल्ह्यात १ हजार ४८२ होमगार्ड आहेत. या होमगार्डना पोलिसांसोबत असलेल्या वाहतूक नियमनातून परत बोलविण्यात आले असले तरी यात्रा, गणेशोत्सव, निवडणूक या ठिकाणी होमगार्ड तैनात असणार आहेत. होमगार्डना कामावरून कमी केले आहे, अशीही अफवा पसरवली जात होती. त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन होमगार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी