(कोटला फोटो आहे)
बाहेर खाणं किंवा पार्टी करणं ही जीवनशैली धोक्याची ठरत आहे. धावपळीच्या या जगण्यात व्यायाम करायला वेळ नाही. त्यामुळे अन्न पोटात राहून त्यातून घातक आजार जडू लागले आहेत. बाहेरचं अन्न खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून त्याचा त्रास हृदयाला होत आहे. त्यामुळे बाहेरच्या मसालेदार अन्नाऐवजी सात्विक जेवणाला प्राधान्य द्यावे.
- डॉ. सुरेश शिंदे, सातारा
४) ...तर होईल गुन्हा दाखल
अन्न व औषध प्रशासन खात्यानेही अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार तळलेल्या तेलाचा पुनर्वापर केल्यास त्या तेलाचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभाग घेते. नमुन्याचे प्रयोगशाळेत परीक्षण केल्यानंतर त्याचा अहवाल तयार केला जातो. अहवालात कोणी दोषी आढळलं, तर त्यांचा अन्न विक्रीचा परवाना रद्द होऊ शकतो. एकच प्रकारचे तेल वारंवार वापरले, तर त्यात पॉलिमरायझेशन प्रक्रिया होऊन तेलातील पोलर कम्पाऊंडचे प्रमाण वाढते. ते प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक नको. असे तपासणीत आढळले, तर त्या विक्रेत्यावर दंडात्मक व गुन्ह्याचे स्वरूप मोठे असेल, तर तुरुंगवासही होऊ शकतो.
५) अहो आश्चर्यम्, एकावरही कारवाई नाही
वडे, भजी, सामोसा, कचोरी विक्रेते अशा वारंवार तळलेल्या तेलाचा वापर सर्रास करतात. तो करत असताना त्यातच नवीन तेल मिसळले जाते. त्यामुळे पोलर कम्पाऊंड २५ टक्क्यांपेक्षा कमी होतो. त्यामुळे कारवाई करताना तपासणीत ते तेल तळण्यायोग्य असेच दिसते. याला टॉपअप असेही म्हटले जाते. तरीही अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी चांगले तेल वापरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवावे, अशी मागणी होत आहे.
...........