सद्या सर्वत्र कोरोनाची भीती गडद होताना दिसत आहे. यासाठी पोलीस, आरोग्य यासह सर्वच शासकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व यंत्रणा अहोरात्र काम करीत आहेत. जगावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी योगदान देणाऱ्या योद्धयांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व रुग्णांच्या उपचारासाठी झटत आहेत. अशावेळी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने येथील दिवंगत दिनकरराव शिदोजी जगताप प्रतिष्ठानने कोरोना योद्धयांचा सन्मान केला.
प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अशोक जगताप यांनी स्वागत केले. श्रीरंग साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. तर मोहन जगताप यांनी आभार मानले.
प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिवराज जगताप, अध्यक्ष भानुदास जगताप, माजी सरपंच सत्यवान जगताप, बाजार समिती सदस्य श्रीरंग साळुंखे, माजी सरपंच दिलीप चव्हाण, मोहनराव जगताप, दीपक जगताप, पी.एस. केंगार, वैद्यकीय अधिकारी एस. एस. घोलप, शुभम जाधव, बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते.
फोटो : २०केआरडी०२
कॅप्शन : वडगांव हवेली, ता. कऱ्हाड येथील दिवंगत दिनकरराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने कोरोना योद्धयांचा सन्मान करण्यात आला.