वाई : वाई तालुका ब्राह्मण संघटनेच्या वतीने कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविडयोद्ध्यांना मदत करण्यात आली.
कोविडयोद्ध्यांना संघटनेतर्फे ट्रॅक सूटचे वाटप करण्यात आले.
वाई शहरातील व तालुक्यातील कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी वाई नगरपालिकेचे १७ कर्मचाऱ्यांचे पथक सध्या कार्यरत आहे. कोविडविरुद्धच्या लढाईत योगदान म्हणून प्रशासन आणि कोविडयोद्धे त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अशा कोविडयोद्ध्यांना श्री परशुराम जयंतीनिमित्त संघटनेतर्फे ट्रॅक सूटचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू कुटुंबांना धान्याचे किट, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक योगदान व अन्नदान करणाऱ्या सामाजिक संस्थांना कच्चा माल पुरवठा करण्यात आला.
यावेळी संघटनेचे प्रशांत नागपूरकर, केदार गोखले, हर्षद पटवर्धन, विशाल मित्रगोत्री, नंदन सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. याकामी शंतनु सोहनी, आनंद पटवर्धन, अमित सोहनी, योगेश चंद्रस, धनंजय महाबळेश्वरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
फोटो : २५ पांडुरंग भिलारे
ब्राह्मण संघटनेच्या वतीने कोविडयोद्ध्यांना ट्रॅक सूटचे वाटप करण्यात आले.