वेळे : छत्रपती सेवा समिती तुळापूर पुणे व फिरंगोजी शिंदे बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित शिवकालीन प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व व काव्य स्पर्धा घेण्यात आल्या. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयावरील स्पर्धेत राजे प्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्याची युवा शिवव्याख्याती सायली प्रमोद भोसले-पाटील हिने भाग घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या धगधगत्या आणि रक्तरंजित इतिहासाबद्दल छोटेसे मनोगत व्यक्त केले होते.
स्वयंरचित काव्य सादर केले त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद व प्रेम मिळाले. त्या प्रेमाच्या जोरावर तसेच महाराष्ट्रातील नामांकित प्रशिक्षकांनी या स्पर्धेत सायलीची क्रमांक एक म्हणून निवड केली. सायलीने या वक्तृत्व स्पर्धेत १०६ स्पर्धकांमधून महाराष्ट्राची मोस्ट व्हायरल कवयित्री म्हणून बहुमान मिळवला. पहिला क्रमांक पटकावला. सायली ही गुळुंब येथील शिवभक्त प्रमोद भोसले यांची कन्या आहे.
===Photopath===
160521\img-20210516-wa0023.jpg
===Caption===
सायली प्रमोद भोसले हीचा बहुमान