पूनम पवार यांचे मूळ गाव चचेगाव असून ढेबेवाडी विभागातील गुढे, ता. पाटण हे त्यांचे माहेर आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत आविष्कारतर्फे त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेचे एम. बी. शेख, उद्योजिका उषाकिरण थुटे, ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुऱ्हाडे, शैला कांबरे, सुचेता कलाजे, संस्थापक संजय पवार, अाविष्कारचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ए. वाय. दिंडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक ए. व्ही. पाटील, सचिव मनोहर शिंदे, संचालिका लता शिंदे, माजी विस्तार अधिकारी विलासराव संकपाळ आदींनी पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार केला.
फोटो : ०१केआरडी०२
कॅप्शन : आगाशिवनगर-मलकापूर येथील पूनम पवार यांना कोल्हापूर येथे गुणवंत शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उषाकिरण थुटे, एम. बी. शेख, किसनराव कुऱ्हाडे, संजय पवार, अनिल पवार आदी उपस्थित होते.