सातारा : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर महाराष्ट्रात जीवघेणे हल्ले होत असताना राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. दररोज होत असलेल्या हल्ल्यांमुळे पत्रकारिता क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा त्वरीत लागू करावा, या मुख्य मागणीसाठी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने उद्या, सोमवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली. (प्रतिनिधी)
पत्रकार संरक्षण कायद्यासाठी घंटानाद
By admin | Published: July 12, 2015 12:33 AM