शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

घरपट्टी थकबाकीदारांच्या इभ्रतीचा भोंगा !

By admin | Published: February 05, 2016 10:56 PM

पालिकेची अनोखी मोहीम : कर थकविणाऱ्या लोकांची नावे लाउडस्पिकरवर करणार जाहीर

सातारा : वर्षानुवर्ष कायद्याची पळवाट घेऊन पालिकेचा कर थकविणाऱ्या बड्या धेंड्यांची नावे गल्लीबोळात फिरून लाउडस्पीकरवर जाहीर करून त्यांच्या इभ्रतीचा भोंगा वसुली विभाग वाजविणार आहे. पालिकेच्या या अनोख्या मोहिमेमुळे इभ्रतीखातर तरी थकबाकीदार पालिकेत येऊन आपला कर जमा करतील, हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम लवकरच सुरू होणार असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.दरवर्षी मार्च महिना जवळ आल्यानंतर पालिकेची वसुली मोहीम सुरू होते. तत्पूर्वी नागरिकांना नोटीस पाठवून थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाते; मात्र तरीही काहीजण याकडे कानाडोळा करतात. वर्षानुवर्ष थकबाकी वाढत चालली असतानाही मिळकतदार मूग गिळून गप्प बसतात. वसुली पथक दारात आल्यानंतर स्थानिक नगरसेवकाच्या वरदहस्ताने वसुली पथकावर दबाव आणला जातो, असा नेहमी आरोप होत असतो. त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकी वाढत जात असते. शहरात तीन हजारांहून अधिक मिळकतदार आहेत. त्यापैकी सुमारे दीड हजार मिळकतदार, थकबाकीदार आहेत. त्यामध्ये पालिकेच्या शिक्षण मंडळाचाही समावेश आहे. याशिवाय बडे धेंडेही कर बुडवतात, असा पालिका प्रशासनाचा अनुभव आहे.थकबाकीदारांमध्ये केवळ ओढग्रस्तीचा संसार करणाऱ्या गरिबांचा समावेश नसून तालेवार मंडळीही कर बुडवतात. हे या निमित्ताने जग जाहीर होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. एखाद्या धेंड्याचे नाव लाउडस्पिकरवरून पुकारले गेल्यास, ज्यांच्यापुढे त्याची ऐट चालते त्यांच्यासमोरच त्याच्या इज्जतीचा भाजीपाला होऊ शकतो. त्यानंतर परिसरात आपल्याविषयी नको त्या चर्चा रंगतील, या धास्तीने बडे धेंडे थकबाकी भरण्यासाठी पालिकेत रांगा लावतील, असा जाणकारांचा होरा आहे.ही मोहीम सुरू करण्यापूर्वी संबंधितांना भेटून पालिकेचे कर्मचारी थकबाकी भरण्याचे आवाहन करत आहेत. सध्या पालिकेत घरपट्टी हरकतीसाठी अर्ज येत असल्यामुळे वसुली विभागाचा वेळ त्यामध्येच जास्त आहे. प्रलंबित कामे संपल्यानंतर पालिकेची वसुली मोहीम लाऊडस्पिकरसह सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)यंदा होणार ११ कोटींची वसुलीपालिकेच्या लिस्टवर एकूण २६ कोटींची थकबाकी आहे. मात्र त्यामधील ६ कोटींची थकबाकी सध्यातरी वसूल न होण्यासारखी आहे. कारण संबंधित मिळकतदारांनी न्यायालयात दावे दाखल केले आहेत. २६ कोटींपैकी ९ कोटी २० लाख पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाची थकबाकी आणि चालू वर्षाचा कर, असा मिळून ११ कोटींची वसुली सध्या पालिका करणार आहे.सध्या मिळकतदारांना थकबाकीसंदर्भात सूचना करत आहे. तरी सुद्धा त्यांनी ऐकले नाही तर येत्या दोन दिवसांत लाउडस्पिकरवर नावे जाहीर करत ही मोहीम सुरू होणार आहे.- आंबादास वणवे (वसुली अधीक्षक, सातारा पालिका)