शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

घरपट्टी थकीत; विंगचा ग्रामपंचायत सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:43 PM

लोकमत न्यूज नेटवर्कशिरवळ : ‘खंडाळा तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या विंग ग्रामपंचायतीचे सदस्य पोपट दिनकर भिसे यांना घरपट्टी थकीतप्रकरणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी अपात्र ठरविले आहे,’ अशी माहिती तक्रारदार महादेव किसन कदम यांनी दिली.विंग (ता. खंडाळा) येथील ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजली जाते. यामध्ये विंग येथील पोपट दिनकर भिसे हे २०१५-१६ मध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिरवळ : ‘खंडाळा तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या विंग ग्रामपंचायतीचे सदस्य पोपट दिनकर भिसे यांना घरपट्टी थकीतप्रकरणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी अपात्र ठरविले आहे,’ अशी माहिती तक्रारदार महादेव किसन कदम यांनी दिली.विंग (ता. खंडाळा) येथील ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजली जाते. यामध्ये विंग येथील पोपट दिनकर भिसे हे २०१५-१६ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आले होते. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्यापासून पोपट भिसे यांनी स्वत:ची घरपट्टी ग्रामपंचायत दप्तरी भरली नसल्याची तक्रार करत त्यांना ग्रामपंचायत सदस्यत्वापासून अपात्र करण्याची मागणी विंग येथील महादेव किसन कदम यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे केली होती.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शासन निर्णयानंतर ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी तक्रारदार महादेव कदम यांनी केलेली तक्रार ग्राह्य मानत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी विंग ग्रामपंचायत सदस्य पोपट भिसे यांना ग्रामपंचायत सदस्यत्वापासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) मधील खंड (ज-१)अन्वये अपात्र करण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे विंग परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.