शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

जगायचे तरी कसे ; घरगुती गॅस दरवाढीने पुन्हा चुली पेटू लागल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:47 AM

सातारा : कोरोनात महागाईचीच झळ बसत असून, घरगुती गॅस सिलिंडर टाकी नुकतीच २५ रुपयांनी महागली. तर वर्षभरात जवळपास २५० ...

सातारा : कोरोनात महागाईचीच झळ बसत असून, घरगुती गॅस सिलिंडर टाकी नुकतीच २५ रुपयांनी महागली. तर वर्षभरात जवळपास २५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक टाकीही वर्षात ४०० रुपयांनी वाढली. यामुळे जगायचे कसे हा प्रश्न असून गृहिणींना चिंता गॅस पेटविण्याची आहे. त्यामुळे पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत.

मागील सवा वर्षापासून कोरोना महामारीचं संकट आहे. यामुळे कामे बंद पडत आहेत. अनेकांचा रोजगार गेला. कोणाला कामावरुन घरी बसावे लागले. अशातच गेल्या वर्षभरात इंधन तसेच गॅस सिलिंडरचे दर सतत वाढत आहेत. यामुळे महागाईची फोडणी अधिकच बसू लागली आहे. विशेष करुन सामान्य कुटुंबही आज सिलिंडरवर अवलंबून आहे. अशावेळी घरगुती सिलिंडर टाकीचे भाव सतत वाढत चालले आहेत.

काही दिवसांपूर्वी टाकीमागे २५ रुपयांची वाढ करण्यात आली. यामुळे ८४० रुपयांपर्यंत टाकी पोहोचली. साधारणपणे पाच माणसांच्या कुटुंबाला महिन्याला एक टाकी लागते. याचा हिशोब केला तर महिन्याला एका टाकीसाठी ८४० रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोनाच्या या काळात सामान्यांना हे परवडणारे नाही.

........................

ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २० मध्ये झालेली वाढ

घरगुती व्यावसायिक

ऑगस्ट ५९९ ११४१

सप्टेंबर ५९९ ११३९

ऑक्टोबर ५९९ ११६४

नोव्हेंबर ५९९ १२४०

डिसेंबर ६९९ १३३१

.............................

जानेवारी २०२१ ते जुलैपर्यंत दरवाढ

जानेवारी ६९९ १३४८

फेब्रुवारी ७९९ १५३९

मार्च ७९९ १५३३

एप्रिल ८१४ १६४६

मे ८१४ १६००

जून ८१४ १५०१

जुलै ८३९ १५६२

.....................................

घरखर्च भागवायचा कसा ?

कोरोना विषाणू संकटामुळे वर्षभरापासून कामे मिळवताना अडचणी येत आहेत. अनेकवेळा घरातच बसून राहण्याची वेळ घरातील पुरुष मंडळीवर आली आहे. त्यातच सिलिंडर टाकीचे दर वाढल्याने चूल पेटविण्याची वेळ आली आहे.

- नीलिमा पाटील, गृहिणी

............................................

मागील वर्षभरापासून महागाईचाच सामना करावा लागत आहे. कारण, भाज्या महागच आहेत. पण, आता सिलिंडरचाही भाव वाढलाय. त्यामुळे अशीच वाढ होत राहिली तर जगायचे कसे हा आमच्यापुढे प्रश्न आहे.

- शांता काळे, गृहिणी

..................................................

डिसेंबरपासून सतत वाढ...

मागील एक वर्षाचा विचार करता घरगुती सिलिंडर टाकीचा दर ५९९ वरुन ८३९ रुपयांवर पोहोचलाय. डिसेंबरमध्ये १०० रुपयांनी वाढ झाल्याने टाकी ६९९ वर गेली. त्याचबरोबर फेब्रुवारीत ७९९, एप्रिलमध्ये ८१४ तर आता जुलै महिन्यात ८३९ रुपये झाली आहे.

..........................................................

ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक...

- शहरी भागात चुली बंद झाल्या आहेत. गॅसवरच सर्व स्वयंपाक होतो. त्यामुळे शहरवासीयांना सिलिंडरशिवाय पर्याय राहिलेला नाही.

- केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातही गॅस आणि सिलिंडर मिळाला. यामुळे गरिबांच्या घरीही शेगडी पेटली. पण, आता सिलिंडरची किंमत सतत वाढत चालल्याने चूल पेटविण्याची वेळ आली आहे.

- सध्यस्थितीत ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबे हे आवश्यकता असेल तरच स्वयंपाकासाठी गॅस पेटवतात. नाहीतर चुलीवरच भाजी व भाकरी केली जाते.

......................................................................................