शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आरोग्य केंद्रात ‘कितने आदमी थे?.. सिर्फ दो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 11:14 PM

अनेक आक्षेपार्ह बाबी उघडकीस; वरिष्ठ अधिकारी करणार चौकशीसातारा : ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु सातारा जिल्ह्यातील तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा पुरवली जात नाही. याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी शुक्रवारी दुपारी इथल्या कारभाराचा पंंचनामा केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.कोयना जलाशयनजीक जावळी तालुक्यात ...

ठळक मुद्दे♦तळदेवला झेडपी उपाध्यक्षांची अकस्मात भेट :♦काही लोकप्रतिनिधी त्याचा वापर आपली संपत्ती वाढविण्यासाठी करतात, ♦केवळ मस्टरवर सह्या करण्यासाठी काही कर्मचारी हजर राहतात.

अनेक आक्षेपार्ह बाबी उघडकीस; वरिष्ठ अधिकारी करणार चौकशीसातारा : ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु सातारा जिल्ह्यातील तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा पुरवली जात नाही. याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी शुक्रवारी दुपारी इथल्या कारभाराचा पंंचनामा केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.कोयना जलाशयनजीक जावळी तालुक्यात अतिदुर्गम तळदेव या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रातील कामकाजाविषयी अनेक तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाºयासह आठ इतर आरोग्य कर्मचारी आहेत. ते कोणाचेही ऐकत नाहीत, राजकीय पाठबळ असल्याने आरोग्याबाबत काम करीत नाहीत. वरिष्ठ अधिकारी यांना नोंदवही, लॉग बुक दाखवले जात नाही. पाण्याचे नमुने घेत नाहीत. अर्ज न देता कर्मचारी गैरहजर राहतात. फार्मासिस्ट नसला तर शिपाई औषध देतात, अशा तक्रारी होत्या.त्यानुसार वसंतराव मानकुमरे यांनी येथे भेट देऊन अनेक बाबी उघडकीस आणल्या. त्यांनी तत्काळ येथील अधिकारी व कर्मचाºयांचे जाब जबाब नोंदविले. दरम्यान, यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज शिकलगार यांच्या व्यतिरिक्त केवळ एक शिपाई आणि एक महिला अधिकारी दवाखान्यात उपस्थित होते. कनिष्ठ सहायक गैरहजर, फार्मासिस्ट दुपारी साडेतीननंतर बाहेर गेलेले. केवळ मस्टरवर सह्या करण्यासाठी काही कर्मचारी हजर राहतात.ही बाब स्पष्ट झाल्यानंतर. याप्रकरणी रीतसर अहवाल तयार केला आहे. स्वत: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या भागात अनेक सुविधा येतात; पण स्थानिक काही लोकप्रतिनिधी त्याचा वापर आपली संपत्ती वाढविण्यासाठी करतात, असा आरोप मानकुमरे यांनी यावेळी केला.कुटुंब कल्याणचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. पाणी नमुने घेतले जात नाहीत, दवाखान्याची वेळ २४ तासांची असताना ग्रामस्थांना सेवा पुरविली जात नाही. फार्मासिस्ट नसताना एएनएम गोळ्या देतात. वैद्यकीय अधिकारी ओपीडीत हजर नसतात, अशा बाबी पंचनाम्यात केल्या आहेत.येथील आरोग्य सुविधा सुधारण्याची अशा ग्रामस्थांनी सोडली आहे. त्यामुळे या स्ट्रिंग आॅपरेशनची चर्चा होते की प्रश्न सुटेल? याकडे लक्ष लागले आहे. यावेळी अधिकारी दिलीप शिंदे, डॉ. शिकलगार, धोंडिबा जंगम, नारायण जंगम व ग्रामस्थ उपस्थित होते....तर १५ आॅगस्टला टाळे ठोकणार..या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आली. मात्र, संपूर्ण इमारत गळत आहे. वैद्यकीय अधिकाºयांचे कर्मचाºयांवर नियंत्रण नाही. स्वाई फ्ल्यूबाबत तत्काळ कारवाई करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकही अधिकारी ग्रामसभेला उपस्थित राहत नाही. ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यापुढे रुग्णालयाच्या अनुषंगाने असणाºया अनेक अडचणी मांडल्या. १५ आॅगस्टपर्यंत रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ बदलण्यात यावा तसेच या दूर झाल्या नाहीत तर १५ आॅगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा तळदेव व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. 

 

आरोग्याबाबत गलथान कारभार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. तळदेव आरोग्य केंद्राबाबतीत अनेक तक्रारी होत्या. प्रत्यक्षभेटीनंतर तर संतापजनक बाबी पुढे आल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला कारवाईच्या सूचना केल्या आहेत.- वसंतराव मानकुमरे,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद