शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

‘नियोजन’मधील हुकमाचे पत्ते आज होणार ओपन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नियोजन समितीच्या निवडणुकीतील हुकमाचे पत्ते कोण-कोण हे आज ओपन होणार आहे. बुधवारी सकाळी १0 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे.निवडणुकीची मत मोजणी नियोजन समितीच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी, दि. 0९ रोजी होणार आहे. या मतमोजणीची ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नियोजन समितीच्या निवडणुकीतील हुकमाचे पत्ते कोण-कोण हे आज ओपन होणार आहे. बुधवारी सकाळी १0 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे.निवडणुकीची मत मोजणी नियोजन समितीच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी, दि. 0९ रोजी होणार आहे. या मतमोजणीची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना लागली असून, निवडणुकीतील ४२ उमेदवारांचे भवितव्य मतोजणीनंतर उलगडणार आहे.जिल्हा नियोजन समितीच्या ४0 जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी ११ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित २९ जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद मतदारसंघातील ६४ पैकी ६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. नगरपंचायतीच्या १३६ मतदारांपैकी १३५ मतदारांनी मतदान केले. नगरपालिका मतदारसंघात १९0 मतदारांपैकी १८८ मतदारांनी मतदान केले होते.मतदानानंतर मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये कडक पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी या पेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आणल्या जातील. नगरपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद मतदारसंघाचे निवडणूक मतमोजणी स्वतंत्ररित्या केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलावर तहसीलदार, नायब तहसीलदार व एक कर्मचारी अशा तिघांची नेमणूक करण्यात आली आहे.बुधवारी, सकाळी १0 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुरुवातीला नगरपंचायतीची त्यानंतर नगरपालिकेची व शेवटी जिल्हा परिषद मतदारसंघाची मतमोजणी केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिली.दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी सुरुवातीपासूनच रणनीती आखली होती. जिल्हा परिषद, नगरपंचायत व नगरपालिकांमध्ये मोठे संख्याबळ असणाºया राष्ट्रवादीलाही इतर सहकाºयांची गरज काही जागांसाठी होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला; परंतु विरोधकांची जागांची मागणी अवास्तव असल्याने राष्ट्रवादीने ज्यादा जागा देण्याबाबत नकार दिला होता. काँगे्रसने दोन तर भाजपने एक जागा बिनविरोध करुन आपले हित साध्य केले. परंतु राष्ट्रवादीने मात्र ही बोलणी करत असताना पक्षाच्या आठ जागा बिनविरोध निवडून आणल्या होत्या.राष्ट्रवादीने काँगे्रससोबत बोलणी चालू ठेवली होती. पण ही बोलणी फिस्कटल्याने राष्ट्रवादीने थेट भाजपशी घरोबा करुन जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरण टाकल्याची चर्चा सुरु झाली आहे.नवीन समीकरणाचे गणित आज सुटेलराष्ट्रवादी व भाजप या दोन पक्षातील सोयरिक कितपत जुळलीय, हे बुधवारी निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या दोन पक्षांनी मांडलेल्या गणिताचे उत्तर बुधवारी निकालानंतर सुटणार आहे. नेत्यांच्या आदेशानुसार मतदान झाले की आपल्या सोयीनुसार मतदारांनी मतदान केले, हे बुधवारी स्पष्ट होईल. सातारा विकास आघाडी, शिवसेना व काँगे्रस यांची मोट कितपत यशस्वी झालीय, हेही पुढे येणार आहे. या नवीन समीकरणांमुळे अनेक जण नाराज झाले आहेत. काही जणांनी तर निष्ठेलाही तिलांजली दिली आहे. कोण कुठे फुटले, याची कारणेही निकालानंतर नेतेमंडळी शोधू लागतील. आपल्या नियोजनानुसारच मतदान झाले आहे का? याची खातरजमा नेतेमंडळींकडून मंगळवारी सुरु होती.बळीचा बकरा कोण?सर्वच पक्षांतील सोयरिकीच्या राजकारणामुळे ‘बळीचा बकरा’ कोण ठरणार?, हेही निकालानंतर यथावकाश समोर येईल. काहींचे ‘बीपी हाय’ तर काहींचे ‘लो’ झाले आहेत. निवडणूक लागल्यानंतर गेल्या महिनाभरापासून पायाला भिंगरी बांधून फिरणाºया उमेदवारांना कितपत यश आलेय, हे बुधवारी स्पष्ट होणार आहे. आपला केवळ वापर झालाय, याचा साक्षात्कारही काहींना येऊ लागलाय.धक्कादायक निकालांची चर्चाजिल्हा परिषद मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघात केवळ ६४ मतदान असल्याने नात्यांचे गणितही मांडले गेलेय. आपल्या विरोधकांचे कायमचे नाक ठेचायचे, या इर्ष्येने काही जण पेटून उठले होते. तर काही लोकांना सोयीस्करपणे जागा देऊन आगामी विधानसभा निवडणुकीची गणितेही आमदारांनी सोडवली आहेत. तर काही आमदारांनी आपल्या वाटेतील काटे दूर करण्याचेही राजकारण खेळले असून धक्कादायक निकाल लागतील, अशी चर्चा सुरु आहे.