पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या जागतिक चिमणी दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. पवार होते. अॅड. सौरभ देशपांडे, प्रा. डी. डी. थोरात उपस्थित होते.
रवींद्र शिंदे म्हणाले की, चिमण्या या मनुष्यवस्तीच्या जवळ फक्त विणीच्या हंगामात घरटी करतात. किंवा राहतात. मात्र, आता जुन्या पद्धतीची घरे कमी झाली आहेत. त्याजागी मोठमोठे सिमेंट काँक्रिटचे बंगले व इमारती उभ्या राहिल्या आहेत. तसेच मोबाइल कंपन्यांचे टॉवर्स उभे राहिले आहेत. या प्रमुख कारणांमुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे.
डॉ. बापूराव जाधव, अनिल बोधे, नीलेश फुटाणे उपस्थित होते. प्रा. डी. डी. थोरात यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. एल. एस. भिंगारदेवे यांनी आभार मानले.