विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे पार पडले. या सोहळ्यासाठी दिंड्या एका पाठोपाठ एक रिंगणातील आपल्या जागेवर जात होत्या. चोपदार रिंगण लावून घेत होते. इतक्यात एक रुग्णवाहिका आपला दिवा वाजवत रिंगणाच्या प्रवेशाजवळ पोहोचली. ज्या ठिकाणी उभं राहण्यासाठी इतभर जागा नव्हती, अशा ठिकाणी वारकऱ्यांनी समयसूचकता दाखवून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. यातून भाविकांना वारकºयांच्या माणुसकीचे दर्शनही घडले.एका दिंडीतीलवारकरी लोणंद-तरडगाव मार्गात अत्यवस्थ झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होते. ही रुग्णयाहिका रिंगणाच्या प्रवेशाजवळ पोहोचली. यावेळी वारकरी, दिंडी चालक, पोलीस कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी दाखवलेल्या माणुसकीतून प्रत्यक्ष माउलींचेच दर्शन भाविकांना घडले.रिंगणातील वारकºयांनी तातडीने या रुग्णवाहिकेला माउलींच्या उभ्या रिंगणातून वाट मोकळी करून दिली. वारकºयांनी केलेल्या माउली.. माउलीच्या गजरात रुग्णवाहिका पुढे मार्गस्थ झाली. पावसाच्या सरी अंगावर घेत अन् प्रचंड गर्दीत तब्बल तीन तास उभ्या असणाºया भाविकांना वारकºयांमधील माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने झाले.
चांदोबाचा लिंबने अनुभवले माणुसकीचे रिंगण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:54 PM