सातारा : सामाजिक बांधीलकीतून साता-यातील विविध संघटनांच्या परंतु एका विचारांच्या व्यक्तींनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय सर्वसाधारण रुग्णालय व जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल असणा-या बाधितांच्या नातेवाइकांना दोनवेळचे जेवण मोफत देत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, साता-यातील कोविडबाधितांची वाढती संख्या, घरामध्ये बाधित असलेला रुग्ण, त्याची काळजी करणारे नातेवाईक हे त्या रुग्णास शासकीय रुग्णालय तथा जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करतात. रुग्णाच्या काळजीमुळे आणि गाव लांब असल्यामुळे त्यांना तेथून कोठेही जाता येत नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे हॉटेल्स बंद, त्यामुळे पोटाचा प्रश्न आ वासून उभा राहतो. अशा या नातेवाइकांसाठी साता-यातील विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी एकत्र येऊन सामाजिक दायित्व समजून या नातेवाइकांचा दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवला. त्यांच्याकडून दिवसभरात जवळपास शंभर डबे जेवण रोज या बाधितांच्या नातेवाइकांच्या मुखात जात आहे, तेही अगदी मोफत.
या उपक्रमास युवराज पवार, सागर भोगावकर, संजय पवार, महेंद्र बाचल यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना संदीप जगताप, राहुल बहुलेकर, संदीप माने, दीपक गडकरी, कुलदीप भोगावकर, सुनीता चिकणे, शंकर गावडे, दीपक शिंदे, महेंद्र जाधव (पिंटूशेठ), राहुल शेडगे, प्रशांत बारटक्के, अॅड. इम्तियाज खान, विजयकुमार धोतमल यांच्यासह देवदूत फाउंडेशन, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हॉकर्स संघटना यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
फोटो आहे