सचिन पवार-शिखर शिंगणापूर --शिखर शिंगणापूरमध्ये शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने भाविकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी वीरभद्र कावडे यांनी गावासाठी आणि भाविकांसाठी टँकरने मोफत पाणीवाटप सुरू केले आहे.भाविकांची पाण्यासाठी चाललेली धावपळ थांबून तहान भागविण्याचे काम केले कावडे यांनी केले आहे. शासन स्तरावर पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी करुन १५ दिवस झाले असून कोणत्याही प्रकारची व्यवस्था अद्याप झालेली नाही. भाविकांसह शिंगणापूर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वीरभद्र कावडे यांनी स्वखर्चाने शिंगणापूर नागरिकासह भाविकांसाठी पाण्याची सोय केली आहे. पाऊस पडेपर्यंत पाणीपुरवठा करणार असल्याची माहिती कावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर) शासनाने टँकर सुरू करावादुष्काळ निवारणासाठी तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकारी तातडीने हालचाल करीत नाहीत. माण तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून शासानस्तरावरुन अद्याप यंत्रणा गतिमान झालेली नाही. शासनाने तातडीने गावासाठी पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.उन्हाची तीव्रता पाहता भाविकांना मंदिराजवळ पाणीपुरवठा होत नसल्याने मोठी गैरसोय होती. भाविकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. टँकरची व्यवस्था करुन भाविकांची सोय करून कावडे यांनी मोठे कार्य केले आहे. माण तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी शिंगणापूर देवस्थानकडे लक्ष द्यावे. - अनिल बडवे, माजी ग्रामपंचायत सदस्य
तहानलेल्या गावासाठी माणुसकीची ‘कावड’!
By admin | Published: May 05, 2016 11:39 PM