शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

माणुसकी हरली कोवळी मने हेलावली!

By admin | Published: September 03, 2015 10:14 PM

नागरिक बघ्याच्या भूमिकेत : अपघातातील जखमीला केली नववी, दहावीच्या मुलांनी मदत

सातारा : बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर त्सुकतेपोटी नागरिक खमीभोवती गराडा घालत असतात; पण जखमीला वेळेत रुग्णालयात नेण्यासाठी कोणीही पुढे येत नसते, हे आपण अनेकदा पाहात असतो. परंतु एकीकडे समाजाची संवेदना बोथट होत चालली असताना दुसरीकडे मात्र सदर बझारमधील कोवळ्या मुलांनी जखमीला मदत करून जीवनदान दिले. रक्तबंबाळ झालेल्या जखमीला पाहून या कोवळ्या मुलांची मने हेलावली. मात्र, जाणत्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने येथे माणुसकी हरल्याचे पाहायला मिळाले.अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे प्रचंड वाढले आहे. काही अपघात चालकांच्या चुकीमुळे तर काही अपघात ओबडधोबड असलेल्या रस्त्यांमुळे होत असतात. अपघातामध्ये जखमी होणाऱ्याला तत्काळ मदत मिळाल्यास त्याचा जीव वाचतो; परंतु जखमीला वेळेत मदत मिळत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अपघातानंतर जखमींच्याभोवती केवळ गराडा घालून ‘फोटोसेशन’ केले जाते; परंतु त्याला मदत करण्यास कोणी पुढे धजावत नाही. काहीजण पोलिसांची कटकट नको तर काहीजण आपल्याला काय करायचाय, या मानसिकतेत असतात.मात्र या सगळ्या जर तर ला सदर बझारमधील नववी, दहावीतील चार कोवळी मुले याला अपवाद ठरल.किरण चंद्रकांत जगदाळे (वय १५), सौरभ प्रताप खरात (१४), देवेश महेश नलावडे (१४), अथर्व संजय दिवेकर (१४) ही मुले बुधवारी सायंकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे क्लासला निघाली होती. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीजवळून ही मुले चालत जात असताना समोर चालेल्या एका सायकलस्वाराला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सायकलस्वार पाच ते दहा फूट उडून रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यातून आणि हाता-पायातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्याचवेळी तेथून बरेच नागरिक चालत, तर काहीजण कार, दुचाकीवरून जात होते. हे सर्वजण त्या जखमीभोवती थांबले; परंतु त्याला मदत करण्यासाठी कोणी पुढे आले नाही. सुमारे दहा मिनिटे तो जखमी रस्त्यावर विवळत पडला होता. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या या कोवळ्या मुलांनी त्या जखमीला उठवून उभे केले. दप्तराच्या कप्प्यात अडकविलेली वॉटर बॅग काढून त्याला पाणी पाजले. त्यानंतर त्यांनी १०८ ला फोन करून रुग्णावाहिकाही बोलावली. या मुलांची ही गडबड सुरू असताना जाणती माणसं मात्र बघ्याच्या भूमिकेत होती. (प्रतिनिधी)कोवळ्या मुलांचा आदर्श घ्या !जखमींना वेळेत मदत मिळाली तर शंभर टक्के त्यांचा जीव वाचतो. यासंदर्भात शासनाकडून जनजागृती केली जात आहे. परंतु अद्यापही लोकांमध्ये संवेदना जाग्या झाल्या नाहीत. या कोवळ्यामुलांनी एक जीव वाचवून कुटुंबाचा आधारवड जपला. हाच आदर्श इतरांनीही घ्यावा.