मणदूरे : कोयना धरणामुळे १९६० साली पूनर्वसन व १९९९ साली निवकणे धरणामुळे पुन्हा पूनर्वसीत होण्याची वेळ आलेल्या पाटण तालुक्यातील आरल गावच्या ग्रामस्थांवर भुमिहीन होण्याची वेळ आली आहे. १९७० च्या दशकात १०० एकर जमीन असणारा येथील शेतकरी सध्या अल्पभुधारकही राहिलेला नाही, हे दुर्दैव. एका गावाचं दोन वेगवेगळ्या धरणांमुळे दोनवेळा पुनर्वसन होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे काम सुुरू असताना १९६० साली सुमारे १५० गावांना आपलं गाव सोडून जावं लागलं. त्यापैकीच एक आरल हे गाव. त्याकाळी या गावाची लोकसंख्या १ हजार ५०० होती. तर कुटूंबसंख्या ९० च्या आसपास. संबंधित कुटूंबांपैकी काहींचे पूनर्वसन धरणापासुन काही अंतरावर तर काहींचे भिवंडीकडे. पुनर्वसनामुळे आरल गावाचे तीन भाग पडले. त्यामध्ये निवकणे आरल, चाफोली आरल आणि भिवंडी आरल या तीन ठिकाणी हे गाव विभागले गेले. त्यापैकी १७ कुटुंबे व १३५ लोकसंख्या असणारे गाव ‘निवकणे आरल’ म्हणून ओळखले गेले. १९६० साली या कुटूंबांनी पदरमोड करून १०० एकर जमीन विकत घेतली. त्यातूनच त्यांनी आपला चरीतार्थ सुरू केला. अशातच निवकणेतील एका ज्येष्ठ ग्रामस्थाने आपली जमिन पुनर्वसित आरल गावच्या गावठाणासाठी देवू केली. त्याच जमिनीवर पुनर्वसित आरल गाव वसलं. अद्यापही त्याचठिकाणी हे गाव नांदत आहे. सध्या येथील कुटुंबांची संख्या ४७ झाली आहे. तर लोकसंख्या २६३ वर पोहोचली आहे. १९९९ साली निवकणे धरणासाठी या पुनर्वसित आरल गावाची ६० एकर जमिन संपादित झाली. धरणाच्या कामासाठी जमिनी उकरल्याने जनतेला खायला अन्न मिळेना, अशी अवस्था झाली. १९८६ साली आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी विधानसभेत आवाज उठवून कोयना धरणासाठी पूनर्वसनाचा कायदा मंजूर करून घेतला. त्यानंतर श्रमीक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलन करून १९९० साली मुंढेवाडी ता. मंगळवेढा (सोलापूर) येथे अवघ्या ५ कुटुंबांना ५ एकराप्रमाणे जमिनी मिळवुन दिल्या. परंतू व्यावसायीकांची दमदाटी झाल्यानंतर या गावकऱ्यांनी आपला गावच बरा म्हणून परत आरल गाव गाठलं. मात्र १९९९ पासून पून्हा निवकणे धरणामुळे गावाचं पूनर्वसन करायचं ठरलं. परंतू शासनाला अजूनही मुहूर्त मिळेना, अशी अवस्था झाली आहे. २००१ पासून बंदी दिनांक असताना शासकीय अधिकाऱ्यांना अजूनही साधे संकलन रजिस्टर तयार करता आलेले नाही, ही शोकांतीका आहे. तळी, बांध, विहिरी यांचा मोबदला अजुनही मिळाला नाही. तर ६५ टक्के वरील व्याज उदरनिर्वाह भत्ता अजूनही मिळाला नाही. पूनर्वसनाचं भिजत घोंंगडं अजूनही कायम आहे. (वार्ताहर)श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून १९८६ पासून पूनर्वसनासाठी लढा देत आलोय. परंतू १९९९ पासून पून्हा नव्या स्वरूपात लढा देण्याची वेळ आलीय. येथील ग्रामस्थ पुनर्वसनासाठी संघर्ष करीत असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे कसलेच सोयरसुतक नाही; आमचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. - अर्जुन सपकाळ, श्रमिक मुक्ती दलमी चौथीत असताना १९६० साली कोयना धरणातून आमचं गाव उठलं. त्यावेळी गाव पुन्हा कुठे वसणार ही चिंता ग्रामस्थांमध्ये होती. त्यावेळी गाव निवकणेत वसले. पून्हा १९९९ ला निवकणे धरणामुळे आमचं पुनर्वसन करायच ठरलं; पण आमची पिढी संपायची वेळ आली तरी शासनाला जाग येईना.- दगडू सपकाळज्येष्ठ ग्रामस्थ, आरलग्रामस्थांचा लढा संपता संपेना !कोयनेत असताना आरल गावातील काही ग्रामस्थांकडे शंभर एकर जमीन होती. एकट्या कुटूंबासाठी एवढी जमिन असल्याने गाव गुण्यागोविंदाने नांदत होते. सध्या मात्र ही कुटुंबे भूमीहिन झाली आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न उग्र बनला आहे. कोयना धरणामुळे गाव उठल्यानंतर पूनर्वसनासाठी २९ वर्ष या गावाने लढा दिला. त्यानंतर हे गाव निवकणेमध्ये वसले; पण १९९९ मध्ये निवकणे धरणामुळे या गावाला पुन्हा विस्थापित होण्याची वेळ आली. गेली ४४ वर्ष हे गाव लढा देत आहे.
शंभर एकराचा मालक झाला भूमिहीन
By admin | Published: February 24, 2015 10:42 PM