शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

अतिवेगामुळे शेकडो प्रवासी टांगणीला

By admin | Published: May 31, 2017 11:06 PM

अतिवेगामुळे शेकडो प्रवासी टांगणीला

!लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : ‘अति घाई संकटात नेई’ या उक्तीप्रमाणे मंगळवारी रात्री पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नऊ वाहनांच्या विचित्र अपघातात चाळीसहून अधिक प्रवाशी जखमी झाले. कऱ्हाड नजिक नांदलापूर गावच्या हद्दीत पाचवड फाटा येथे नऊ वाहने एकाचवेळी पाठीमागून एकमेकांवर आदळ्ल्यामुळे अबालवृद्धांसह लहान मुलांच्यात एकच हाहाकार उडाला. तर महामार्गावरील अतिवेगामुळे शेकडो प्रवासी रात्रभर टांगणीला लागले. या अपघातामुळे तब्बल चार तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांपुढे रात्रभर महामार्गावरच थांबून दुसऱ्या वाहनांची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिला नाही.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच अतिवेगामुळे अपघात घडतात. मंगळवारी रात्री पावने अकरा वाजण्याच्या सुमारास झालेला अपघात हा अंगावर शहारे आणणाराच होता. गाडीतील डिझेल संपले म्हणून महामार्गाच्या रस्त्याकडेला थांबलेल्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकवर अतिघाई असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली. काही कळण्याच्या अगोदरच एकापाठोपाठ एक पाच वाहने धडकली. यावेळी महामार्गावर एकच हाहाकार उडाला. दोन लक्झरी बसमधील प्रवासी बसमध्येच अडकून पडले तर दोन वाहनांचे चालक वाहनांमध्येच अडकले. या अपघातात मुंबईला जाणाऱ्या तीन खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस, दोन टेम्पो, दोंन जीप व दोन ट्रक अशा एकूण नऊ वाहनांचा अपघातात समावेश होता.यावेळी अचानक घडलेल्या अपघातामुळे लक्झरीबसमधून मुंबईला निघालेल्या शंभरहून अधिक प्रवाशांचा घोटाळा झाला. त्यातील सुमारे चाळीसहून अधिक प्रवासी जखमी झाले. त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी महामार्ग देखभाल विभाग, महामार्ग पोलिस व कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील वाहतूक उपमार्गावरून वळवून १०८ क्रमांकाच्या दोन व महामार्ग देखभाल विभागाच्या दोन रूग्णवाहिकांमधून तब्बल चाळीस जखमींना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी एक गंभीर जखमी महिला वगळता इतर जखमींवर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. या गोंधळात प्रवाशांना मात्र, मोठ्या प्रमाणावर हाल सोसावे लागले. धडक होताच दरवाजे ‘लॉक’मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात नऊ वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे धडक होतात वाहनांचे दरवाजे अचानक लॉक झाले. त्यामुळे चालकांसह आतमधील प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते. पोलिस अधिकाऱ्यांसह मदत करणाऱ्या नागरिकांनी एक-एक वाहन पुढे घेत गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली.शेकडो नागरिक धावले मदतीला!मंगळवारी रात्री नऊ वाहनांचा विचित्र अपघात झाला. याची माहिती काही क्षणातच नांदलापूर गावात पसरली. अपघाताची भिषणता विचारात घेऊन नांदलापूरमधील शंभरहून अधिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. वाहनांत अडकून पडलेल्या चालकांसह प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी महामार्ग देखभाल विभागासह पोलिसांनाही या नागरिकांनी मदत केली.खासगी बसचा वेग ‘अ’मर्याद पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज शेकडो खासगी प्रवासीबस प्रवाशांची वाहतूक करतात. या बस चालकांची वेगावर मर्यादा नसते. तर बसथांब्याचा पत्ताच ठरलेला नसतो. महामार्गावरच कोणत्याही ठिकाणी बस उभ्या करून प्रवाशांची चढ-उतार केली जाते. त्यांच्या अतिवेगामुळेच अनेक अपघाताच्या घटना घडतात. याचीच प्रचिती मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात आली.खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन बसमधून शंभरहून अधिक प्रवासी मुंबईला निघाले होते. अचानक अपघात झाल्यामुळे हे सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. कोणाच्या तोंडाला तर कोणाच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या. यावेळी जखमींना रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहिकेत बसा असे पोलिसांनी सांगताच अनेक प्रवाशांनी उपचारासाठी जाण्यास नकारच दिला. अधिकाऱ्यांसह पंधरा कर्मचारी मदतीलाअपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग देखभाल विभाग, कऱ्हाड शहर पोलिस ठाणे व महामार्ग पोलिस अधिकाऱ्यांसह पंधरा कर्मचारी मदतीसाठी धावले.चार तास वाहतूक विस्कळीतमंगळवारी रात्री पावनेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील वाहने महामार्गावरच असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक उपमार्गावरून वळविण्यात आली होती.