नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला आठ एप्रिलपासून सुरुवात होत असून, राज्यातील सुमारे ४९०० गावांत तुफान येणार आहे. यावर्षी गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून, राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके स्पर्धेत सहभागी झाले आहेत.तीन वर्षांपासून राज्यात अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा, बीड आणि अमरावती हे तीन जिल्हे या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यानेच अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला होता. कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने हा क्रमांक पटकावला होता. दुसºया स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सातारा जिल्ह्याने दुसºया वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. त्यामध्ये अधिक करून माण तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग होता. जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. यामध्ये डीपसीसीटी, ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण, सीसीटी, वृक्षारोपणासाठी खड्डे, विहीर पुनर्भरण, माती परीक्षण, बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, गळती काढणे, नवीन नालाबांध तयार करणे आदी कामांचा समावेश होता.वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा दि. ८ एप्रिलपासून सुरू होत आहे. हे काम ४५ दिवस चालणार असून, दि. २२ मे रोजी स्पर्धा संपणार आहे. यावर्षी स्पर्धेत राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके उतरले आहेत. यामध्ये ४९०० गावांचा समावेशआहे.सातारा जिल्ह्यातही यावर्षी गतवर्षीप्रमाणेच माण, खटाव आणि कोरेगाव हे तालुके आहेत; पण यावर्षी स्पर्धेतील गावांची संख्या वाढली असून, ती १६३ इतकी झाली आहे. त्यामध्ये माण तालुका ६६, खटाव ५७ आणि कोरेगाव तालुक्यातील ४० गावांचा समावेश आहे. सध्या वॉटर कपमध्ये सहभागी झालेल्या गावांत जनजागृती, ग्रामसभा घेण्याचे काम सुरू आहे.यावर्षीही माण तालुका आघाडीवर...वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा यावर्षी सुरू होत आहे. या स्पर्धेत माण तालुका सातारा जिल्ह्यात आघाडीवर आहे. गेल्यावर्षी माणमधील ३२ गावांचा सहभाग होता तर यावर्षी तब्बल ६६ गावांनी सहभाग घेतला आहे. यामधील अनेक गावे ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. असे असतानाही ही गावे गट-तट विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र आली आहेत.
सातारा जिल्ह्यातील १६३ गावांत तुफान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 10:57 PM