चाफळपासून दोन किलोमीटर अंतरावर शिंगणवाडी हे गाव आहे. नुकतीच या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. गावच्या सर्वांगीण विकासासाठी सुरुवातीला निवडणूक बिनविरोध करण्यावर सत्ताधारी पाटणकर गट व विरोधी देसाई गटाच्या पदाधिकाऱ्यांत खलबते झाली. मात्र, सर्वांचे एकमत न झाल्याने अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला. यात गमतीशीर बाब अशी होती की, मंत्री देसाई गटातून देसाईंचे कट्टर समर्थक माजी सरपंच वसंतराव पवार हे स्वत: निवडणुकीला उभे राहत त्यांनी त्याच वॉर्डातून पत्नी अलका पवार यांना उमेदवारी दिली. यावर मग विजय रामचंद्र पवार यांनी खेळी खेळत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचे स्वीय सहायक शंकर पवार व त्यांची पत्नी रेखा या दोघांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली. मतदारराजा नक्की कुणाच्या बाजूने कौल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर मतदारराजाने पाटणकरांच्या परिवर्तन पॅनेलला स्पष्ट बहुमत देत विरोधकांना चितपट करून टाकले. ग्रामपंचायतीत सत्तांतर घडत देसाई गटाच्या ताब्यातील सत्ता पाटणकर गटाकडे आली.
- कोट (फोटो : २२शंकर पवार)
शिंगणवाडी गावच्या सूज्ञ मतदारांनी विकासाच्या बाजूने मतदान केले. धनशक्तीचा पराभव करत ग्रामपंचायतीत घडवलेल्या परिवर्तनास तडा न जाऊ देता निश्चितच गावचा सर्वांगीण विकास करणार आहे.
- शंकर पवार
फोटो : २२केआरडी०५
कॅप्शन : शिंगणवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविल्यानंतर विजयी उमेदवारांनी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची भेट घेतली.