शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

पत्नीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची पतीची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:14 PM

पतीने शरीरसंबंधावेळी व्हीडिओ शूट करून ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी उच्चशिक्षित पत्नीला मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपत्नीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची पतीची धमकीसाताऱ्यातील घटनेने खळबळ; पतीसह तिघांवर गुन्हा

सातारा : पतीने शरीरसंबंधावेळी व्हीडिओ शूट करून ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी उच्चशिक्षित पत्नीला मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे. संबंधित विवाहितेच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यावही गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेले माहिती अशी, संबंधित विवाहितेचा विवाह ऑगस्ट २०१७ मध्ये झाला होता. यावेळी तिच्या माहेरकडून ८ तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख १ लाख हुंडा म्हणून दिले होते. लग्नावेळी पतीने रिसेप्शन रद्द केले होते. त्याबाबत उच्चशिक्षित असलेल्या पत्नीने विचारणा केल्यानंतर चिडून पतीने मारहाण केली.

यानंतर पती आणि सासू याने तब्येत कमी कर, तुला जेवण बनवता येत नाही, माहेरूनहून १२ लाख रुपये आण अशा अनेक कारणांवरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.

तसेच पतीने शरीर संबंधावेळी उच्चशिक्षित पत्नीचे व्हिडिओ बनवून व फोटो काढले होते. घरात होणार्‍या जाचहाटाबद्दल कोणास सांगितले तर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून पतीकडून विवाहितेला मारहाण करण्यात येत होती.दरम्यान, विवाहितेला १२ लाख रुपये माहेरवरून घेऊन ये, या कारणावरून घरातून हाकलून दिले. याबाबतची फिर्याद शाहुुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पती व सासू सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर