वडूज: ‘कोरोना महामारी काळात आरोग्य विभाग व प्रशासनावर अधिकच ताण पडला असून, गावोगावी होम आयसोलेशन सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सातेवाडी येथील हुतात्मा स्मृती होम आयसोलेशन इतरांना मार्गदर्शक ठरेल,’ असा आत्मविश्वास प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे यांनी व्यक्त केला.
सातेवाडी, ता.खटाव येथील मधुमाला मंगल कार्यालयात सुरू असलेल्या होम आयसोलेशन केंद्रावरील बाधितांना औषधे व फळे वाटप करते प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सभापती संदीप मांडवे, माजी सरपंच हणमंत कोळेकर व प्रयास सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डाॅ. मांडवे म्हणाले, बाधित रुग्णांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत. प्राणवायू वाढविण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच सकस आहार व वेळेवर औषधे घेतली, तर या संसर्गजन्य आजारांवर मात करणे सहज शक्य शक्य आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन बोटे, आशा स्वयंसेविका वंदना बोटे, परिचारिका ए.जे. गंभरे, डाॅ. प्रवीण चव्हाण, रोहित शहा, विशाल भागवत, अक्षय कुंभार, अनिकेत कुंभार आदींची प्रमुख होती.
(चौकट)
संस्थेने जोपासली माणुसकी....
गत वर्षी मायणी येथे सुरू झालेल्या कोरोना केअर सेंटरसाठी २५ रुग्णांसाठी लागणाऱ्या साहित्याचे किट तसेच कोविड १९ च्या महामारीत सर्वजण आपापल्या परीने मदत करत आहेत. परंतु अशी संकटे येऊच नयेत व आलीच तर त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून प्रयास संस्था गेले सहा-सात वर्षे पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करत आहे.
०७वडूज
फोटो- प्रयास सामाजिक संस्थेच्यावतीने हुतात्मा स्मृती होम आयसोलेशनमधील रुग्णांना फळे वाटप करताना डाॅ. कुंडलिक मांडले, मुन्ना मुल्ला, माजी सभापती संदीप मांडले आदी उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)