शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

मी भाजपबरोबर? कदापिही नाही!-- सदाभाऊ खोत :

By admin | Published: January 06, 2017 12:33 AM

‘काय म्हणता... मी भाजपबरोबर? कदापिही शक्य नाही. जे कोण ही चर्चा करीत आहेत, त्यांनाच विचारा, यामागचे कारण काय?

सातारा : ‘काय म्हणता... मी भाजपबरोबर? कदापिही शक्य नाही. जे कोण ही चर्चा करीत आहेत, त्यांनाच विचारा, यामागचे कारण काय? कारण खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर असलेली पंचवीस वर्षांची दोस्ती तुटायची नाही,’ या शब्दांत साताऱ्याचे नूतन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सहपालकमंत्री पद मिळाल्यानंतर गुरुवारी ते प्रथमच साताऱ्यात आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिल्यानंतर बोलत होते. सर्वप्रथम ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी ‘लोकमत टीम’शी संवाद साधला. ‘माझ्या कामाची पद्धत पाहूनच कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आणखी काही खात्यांची जबाबदारी दिली असावी. याचा अर्थ मी लगेच माझा पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार, असा कसा होऊ शकतो? खरेतर विरोधक असल्यापासून माझी फडणवीस यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक विषय विरोधक म्हणून एकत्र येऊन राज्यात गाजविले आहेत. आमची मैत्री केवळ सत्तेपुरती नव्हती अन् राहणार नाही.’मुख्यमंत्र्यांकडून नवीन सूचनांचे स्वागतमी शेतकरी संघटनेत काम करीत असल्याने ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मला चांगली जाण आहे. यासंदर्भात काही सूचना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर माझ्या सूचनांचे त्यांनी नेहमीच स्वागत केले, असेही सांगायला खोत विसरले नाही. सदाभाऊ मोठे झाले तर मला का वाईट वाटावे, ते पक्ष सोडणार नाहीत : शेट्टीकोल्हापूर : राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे चळवळीच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रवाहातून बाजूला जाऊन ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी सुतराम शक्यता नाही. त्यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्व दिले गेले तर त्याचे मला वाईट वाटण्याचे कारणच नाही कारण संघटनेतून त्यांना मंत्री करा, असे मीच सरकारला सुचविले होते असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली असून, सदाभाऊ भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या दोन-तीन दिवस प्रसिद्धी माध्यमांतून चर्चेत आहेत. त्या अनुषंगाने ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, ‘आम्ही दोघेही गेली पंचवीस वर्षे एकत्र चळवळीत काम करीत आहे. सदाभाऊंना मंत्री करावे असे संघटनेतून एकमेव नाव आम्ही सुचविले होते. त्यावेळीही कोणताच वाद नव्हता. मंत्री झाल्यावर सरकारच्या कामाबद्दल जसे चळवळीत आक्रमकपणे बोलता येते तसे बोलता येत नाही, त्यामुळे त्यांची भाषा थोडी नरम झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. मंत्रिमंडळात त्यांचे महत्त्व वाढले तर त्याचे मला वाईट वाटायचे कारण नाही. कारण माझा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. मला चळवळीचा आधार घेऊन सत्तेत जायचे असते तर यापूर्वीच ते करता आले असते. शेतकरी चळवळीचे उत्तरदायित्व माझ्यावर आहे आणि सरकार चुकत असेल तर त्याविरोधात आक्रमकपणे बोलून सरकारला जाग्यावर आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हीच भूमिका मी सध्या पार पाडत आहे. सरकारवर दबाव टाकण्याचे तेवढे एकच अस्त्र आमच्याकडे आहे. कारण आमचा एकही आमदार नाही.’