कोयनानगर (जि. सातारा) : महायुतीचे शासन जनतेची सेवा करणारे सरकार आहे. मी घरात बसणारा नव्हे तर जनतेत मिसळणारा मुख्यमंत्री आहे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा शिवजयंतीपर्यंत उभारणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या २८९ कोटींच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना ही महिलांना हातभार, पत व आत्मसन्मान वाढविण्यासाठी सुरू केली असून, कधीही बंद होणार नाही. योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा मारा. जेवढी गर्दी जिल्ह्याच्या लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला होत असते, त्यापेक्षा जास्त पाटण तालुक्यात जमली आहे, ही शंभूराज देसाई यांच्या कामाची खरी पोचपावती आहे.
सकल धनगर समाजाकडून सत्कारधनगर समाजाला दहा कोटींचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय स्मारकाचे मंजुरी पत्र मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याबद्दल धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे व शंभूराज देसाई यांचा सत्कार करण्यात आला.