“ईडी चौकशीला मी तयार, हिंमत असेल तर समोर या,” उदयनराजेंचे अजित पवार यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 10:19 PM2022-06-17T22:19:52+5:302022-06-17T22:20:27+5:30
तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही समोर या, उदयनराजेंचं थेट आव्हान.
सातारा : “एखादा माणूस काम करत असेल तर त्याला करू द्या. उगाच उठसूट खंडणीचे आरोप करू नका. मी ईडी चौकशीसाठी केव्हाही तयार आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही समोर या,” असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
उपमुख्यमंत्री पवार पाच दिवसांपूर्वी माण तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकप्रतिनधींमुळे सातारा एमआडीसीचा विकास खुंटला’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा खा. उदयनराजे यांनी शुक्रवारी आपल्या शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, “पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या शहरात एमआयडीसीला परवानगी दिली जात होती. त्यावेळी ज्यांच्याकडे सत्ता होती. ज्यांच्याकडे मंत्रिपद होते, त्यांनी आपली जबाबदारी का पार पाडली नाही? त्यावेळी सातारा जिल्ह्यातील एमआयडीसी का विकसित झाली नाही. त्यावेळच्या तत्कालीन आमदार, खासदारांनी एमआयडीसीकडे लक्ष का दिले नाही?”
“ईडी चौकशीला मी तयार, हिंमत असेल तर समोर या,” उदयनराजेंचे अजित पवार यांना आव्हान#udayanrajebhosalepic.twitter.com/mXk45GouNm
— Lokmat (@lokmat) June 17, 2022
१९७४ रोजी सातारा आणि नगरची एमआयडीसी विकसित झाली. कालांतराने नगरची एमआयडीसी विकसित झाली. मग साताऱ्याची का नाही? हा प्रश्न जसा जनतेला पडतो, तसा तो मलाही पडतो. उगाच एकमेकांवर जबाबदारी झटकू नका. सातारा एमआयडीसीची दयनीय अवस्था का व कोणामुळे झाली हे मी सांगण्याची गरज नाही. एलएनटी, इंडियन सिमिलेन्स पाईप, डॉक्टर बेग या कंपन्या साताऱ्यात येणार होत्या. त्या दुसरीकडे कशा गेल्या? एमआयडीसीचा ले आऊट जेव्हा तयार होतो तेव्हा पेट्रोल पंप, कर्मचाऱ्यांची वसाहत आदी कामांसाठी जागा दिली जाते. असे असताना एमआयडीसीतील प्लॉट कोणी विकत घेतले हे बघा. अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे, शासनाची परवागनी आणायची, मग घरे बांधायची, आजवर हेच चालत आल्याचा आरोपही उदयनराजे यांनी केला.