शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

इचलकरंजीत नळ मीटरच्या चौकशीचे आदेश

By admin | Published: March 28, 2016 11:34 PM

नावे कळविण्याचे निर्देश : संबंधितांकडून ५८ लाख रुपयांच्या वसुलीच्या शक्यतेने नगरपालिकेमध्ये खळबळ

इचलकरंजी : साधारणत: आठ वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आलेली नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडील नळ मीटर प्रकरणी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अठ्ठावीस लाख रुपयांची ही मीटर असून, या प्रकरणातील अनियमितपणास जबाबदार अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांची नावे कळविण्याचे निर्देशही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती, जलअभियंता, आदींकडून व्याजासह ५८ लाख रुपयांची वसुली होण्याची शक्यता असल्याने येथील नगरपालिकेमध्ये खळबळ उडाली आहे.सन २००८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षांच्या हुकूमाने शहरातील नळांना जलमापन यंत्रे (मीटर) बसविण्याची निविदा मागविण्यात आली होती. या निविदाप्रकरणी भंवरलाल चांदमल लोहिया, लक्ष्मी पॅकेजिंग, कापड मार्केट, इचलकरंजी या कंपनीकडून पाच हजार मीटर खरेदी करण्यात आले. क्रांती कंपनीची मीटर नगरपालिकेच्या भांडाराकडे जमा करून त्यावर वेळोवेळी धनादेशही घेण्यात आले होते. हे मीटर अत्यंत हलक्या दर्जाचे असल्यामुळे त्याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी येथील एक सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता या निविदा प्रकरणातील बोगसगिरी लक्षात आली, असे माणगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.ते म्हणाले, मीटर खरेदी करताना मीटरवर ५४० रुपये इतकी कमाल किंमत असूनसुद्धा हे मीटर ७४० रुपयांप्रमाणे खरेदी केली. त्यावेळी निविदाधारकाने मीटरचा पुरवठा करताना टप्प्याटप्प्याने केला आणि त्याच पद्धतीने टप्प्याटप्प्यानेच मीटरची किंमत पालिकेकडून धनादेशाद्वारे घेतली. या खरेदी प्रकरणात जिल्हा दर सूचीचे पत्र बोगस जोडण्यात आले होते, तर १५ एमएम बी क्लास अशा वर्णनाची मीटर पाहिजे असल्याची नोंद निविदेत असताना १५ एमएम ए क्लास या प्रतीच्या मीटरची तुलना करून या मीटरसाठी जादा दर घेण्यात आला.मीटर ही पूर्णपणे प्लास्टिक फायबरची असून, त्यावर धातूचा मुलामा चढविण्यात आला आहे. मात्र, हे मीटर तकलादू असल्याने त्याच्यामध्ये लवकरच बिघाड होऊ लागले. मीटर घेतल्यानंतर एका साध्या कागदावर त्याचे बिल मागणी करण्यात आले. या कागदावर विक्रीकर नोंदणी नसल्याने निविदाधारकाने त्याचा करही अदा केला नाही. अशा प्रकारे पूर्णपणे बोगसगिरी करून अठ्ठावीस लाख रुपयांची नगरपालिकेची लूट झाल्याबद्दल माणगावकर यांनी गेले वर्षभर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, या प्रकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेकडे लेखी पत्र नुकतेच पाठविले आहे आणि या प्रकरणातील अनियमिततेस जबाबदार असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि पदाधिकारी यांची नावे कळविण्याचे निर्देश नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना दिले आहेत, असेही दिलीप माणगावकर यांनी स्पष्टपणे सांगितले. (प्रतिनिधी)चुकविलेल्या विक्रीकराची वसुलीपाणी मीटर खरेदी प्रकरणात शासनाचा विक्री कर बुडविल्याबद्दल विक्रीकर खात्याकडे माणगावकर यांनीच तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून विक्रीकर विभागाने या प्रकरणातील मक्तेदार भंवरलाल लोहिया यांचा पत्ता मिळावा, अशी मागणी तत्कालीन मुख्याधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडे केली होती. लोहिया यांचा पत्ता मिळताच विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोहिया यास विक्रीकर चुकवेगिरीबद्दल व्याजासह अठरा लाख रुपयांची नोटीस काढली. दरम्यान, लोहिया इचलकरंजीतून परांगदा झाले होते. मात्र, त्यांना कर्नाटकातून शोधून त्यांच्याकडून बारा लाख रुपये वसूल केल्याचेही माणगावकर यांनी पत्रकारांना सांगितले.