माणिक डोंगरे।मलकापूर : गावाच्या वाढीच्या दृष्टीने १९९१ ते २००१ दशक पोषक ठरले होते. प्राप्त माहितीनुसार २००१ च्या जनगणनेनुसार ५ हजारांवर आसलेली लोकसंख्येत २२ हजार ३९२ इतकी म्हणजे चारपटीने वाढ झाली. लोकसंख्येच्या तुलनेत प्राथमिक सुविधांचा अभाव जाणवू लागला. त्यामुळे ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्यासाठी विचार विनिमय सुरू झाला.
मलकापूर हे गाव कºहाड पालिकेच्या हद्दीलगत असून, महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या दुतर्फा एकूण ९ चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रात विखुरलेले आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करता कºहाडला कोयना व कृष्णा नदीने तिन्ही बाजूने वेढल्यामुळे बिनशेती विकासाच्या दृष्टीने मर्यादा येतात. कºहाड शहरालगत असणाऱ्या भागात वास्तव्य करण्याचा लोकांचा कल आहे. मलकापूर हद्दीतून महामार्ग जात असल्यामुळे रहदारीच्या अनुषंगाने सुविधाजन्य परिस्थिती मलकापूर भागातच जास्त झाली आहे.
हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, पेट्रोलपंप, ट्रान्सपोर्ट आदी व्यवसाय महामार्गाच्या दोन्ही बाजूला फोफावल्याचे दिसतात. १९९१ च्या प्राप्त माहितीनुसार या भागात ५० हॉटेल्स सुरू झाली, त्यामध्ये पाच हॉटेल्स चांगल्या लॉजिंग-बोर्डिंगची सेवा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला या गावाच्या कार्यक्षेत्रात लहान-मोठ्या कारखान्यांचीही निर्मिती झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जुनी किर्लोस्कर कंपनीला निगडित महिला उद्योग व कोयना औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाली. या उद्योगावर आधारित छोट्या लघुउद्योगाची आपोआप निर्मिती होत गेली. परिणामी स्थानिक लोकांना पैसे मिळू लागले. त्या मिळालेल्या उत्पन्नातून रोजगार निर्मितीचे पर्याय निर्माण होऊ लागले. परिणामी याच कालावधीत लोकसंख्या व लोकवस्ती वाढली. २००१ च्या प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायतीकडे एकूण सात हजार मिळकतीची नोंद होती. त्यामध्ये महिन्याला २० ते २५ मिळकतींची भरच पडत होती. गावातील आकर्षित रोजगारांची टक्केवारी ५६ टक्के इतकी निर्माण होऊन गावाची या दशकातील वाढ स्वाभाविक नसून ती विकासाच्या परिणामामुळे झाली असावी.गटा-तटाच्या राजकारणामुळे तुकडेगावची झपाट्याने होणारी वाढ व वाढती लोकसंख्या लक्षात घेता अनेक समस्या वाढत गेल्या. गावात गटातटाचे राजकारण सुरू झाले. जमिनीचे लहान-लहान तुकडे होत होते. अरुंद रस्ते, मूलभूत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होऊ लागले. नियोजनाच्या समस्या डोके वर काढू लागल्या. भविष्यातील समतोल राखण्यासाठी व नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी गावाला /नगरपंचायत स्थापन करण्याच्या दृष्टीने विचारप्रवाह निर्माण होऊ लागले.शैक्षणिक संस्था, उद्योगांचे वाढले जाळेमलकापूरला शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी नऊ सरकारी व खासगी प्राथमिक शाळा निर्माण झाल्या. जिल्हा परिषद शाळांबरोबर मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अशोकराव थोरात यांनी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळ, भारती विद्यापीठ, कृष्णा रुग्नालयामार्फत चालविल्या जाणाºया विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या. या सर्व सुविधांना पूरक विकासाच्या दृष्टीने बँका, नागरी बँका, सहकारी बँका व पतसंस्थांचे जाळे निर्माण होऊ लागले.