खोडशी, ता. कऱ्हाड येथे नव्याने बसविण्यात आलेल्या स्वतंत्र २५ केव्हीए ट्रान्सफॉर्मरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष देवराज पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक पांडुरंग चव्हाण, सर्जेराव खंडाईत, राजेश पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार खोडशी गावातील कृषिपंप ग्राहकांनी थकीत वीज बिलाची रक्कम महाविरणकडे जमा केलेली आहे. महाविरणकडून प्रलंबित कामे पूर्ण करून घेण्यासाठीही प्रयत्न केला. ही बाब महत्त्वाची असून, राज्यात थकीत वीज बिलाच्या वसुलीपोटी ३३ टक्के निधी विकास कामासाठी उपलब्ध होण्याचा पहिला मान खोडशी गावास मिळाला. यापुढेही गावच्या विकासासाठी परस्परांमध्ये ऐक्य वाढवावे.
यावेळी माजी सभापती देवराज पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. उपकार्यकारी अभियंता ए. बी. पाटील, शाखा अभियंता बाबासाहेब पवार, सरपंच महेश काटकर, उपसरपंच सिंधूताई सावंत, आनंदराव जाधव, दाजी पाटील, हणमंत भोसले, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
सह्याद्री कारखान्याचे संचालक पांडुरंग चव्हाण यांनी केले. श्रीकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर ताजुद्दीन मुजावर यांनी आभार मानले.