सातारा : ‘कोणा शिक्षकावर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल. शिक्षक व शिक्षणासंदर्भात गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांबरोबर संयुक्त बैठक घेऊ,’ असे सांगून शिक्षकांच्या शिष्टमंडळाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासित केले.साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या सभागृहात राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ होता. त्यासाठी बुधवारी सकाळी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे शासकीय विश्रामगृहावर आले होते.
यावेळी राज्यातील विविध शिक्षकांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. विश्रामृहात आल्यानंतर पाच मिनिटांतच मंत्री तावडे यांनी एक-एका शिष्टमंडळाला भेटण्यास सुरुवात केली. सर्वांच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले.यावेळी त्यांना काही प्रतिनिधींनी शिक्षक संख्या कमी असल्याचे कारण सांगितले. तर कोणी शाळा मूल्यांकनाचा विषय काढला. ज्या शाळा मूल्यांकनात भरल्या नाहीत, त्यांना तोटा झाला आहे.
माध्यमिक शिक्षकांना १२ वर्षांनंतर वरिष्ठ श्रेणी मिळाली ती फक्त १०० रुपयांचीच, असेही काहींनी सांगितले. त्यानंतर मंत्री तावडे म्हणाले, ‘काँग्रेसने सर्वांनाच मूर्ख बनविले आहे. कागदावरच सर्व दाखवले, कोणावर अन्याय झाला असेल तर तो दूर करू, प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय सरकार होऊ देणार नाही. त्यासाठी गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.पुस्तके द्या... मी बुके घेत नाहीविश्रामगृहात मंत्री तावडे शिष्टमंडळांबरोबर चर्चा करीत होते. त्यावेळी अनेकांनी पुष्पगुच्छ देण्याचा त्यांना प्रयत्न केला; पण तावडे यांनी ‘मी पुष्पगुच्छ घेत नाही. मला पुस्तके द्या,’ असे सांगितले. त्यामुळे अनेकांनी पुष्पगुच्छ आणूनही तो दिला नाही.नंदा जाधव यांच्या नावाने क्रीडा प्रबोधिनी
साताºयाची कन्या व आंतरराष्ट्रीय धावपटू दिवंगत नंदा जाधव यांच्या नावाने साताºयात क्रीडा प्रबोधिनी मंजूर करावी व त्यांच्या जीवनावर आधारित धड्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा, अशा मागणीचे निवेदन नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने टी. आर. गारळे यांनी दिले.सेवानिवृत्त पदवीधर शिक्षकांना निवडश्रेणीसाताºयाच्या नगरपालिका शिक्षण मंडळातील १४ निवृत्त पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पूर्वलक्षी प्राधान्याने निवडश्रेणी मिळून आर्थिक लाभ द्यावा, अशा मागणीचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री तावडे यांना विजय निकम व शौकतभाई पठाण यांच्या शिष्टमंडळाने दिले.शिक्षण विभागातील रिक्त पदे भरा...भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर यांनी मंत्री तावडे यांना निवेदन दिले. सातारा जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, तीन उपशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांची पाच पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे शिक्षणावर परिणाम होत असून, ही पदे भरावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर मंत्री तावडे यांनी याबाबत लवकर कार्यवाही केली जाईल, असे बाबर यांना सांगितले.